पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ७३ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (८ जानेवारी) ७३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १०,  नवीन पनवेल १३, खांदा काॅलनी ६, कळंबोली ८, कामोठे १०, खारघर २५,  तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५, नवीन पनवेल ४,  कामोठे ४, खारघर येथील ८ येथील  रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २७९२६ कोरोना रूग्णांपैकी २६८४४ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६१० जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४७२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा -

पोलिस भरतीचा जीआर अवघ्या काही तासात रद्द

MPSC च्या परीक्षा जाहीर; शुक्रवारी तारखा जाहीर होण्याची शक्यता


पुढील बातमी
इतर बातम्या