Advertisement

MPSC च्या परीक्षा जाहीर; शुक्रवारी तारखा जाहीर होण्याची शक्यता

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षांबद्दल अंतिम निर्णय घेतला असून, परीक्षांच्या तारखेबाबत शुक्रवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

MPSC च्या परीक्षा जाहीर; शुक्रवारी तारखा जाहीर होण्याची शक्यता
SHARES

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षांबद्दल अंतिम निर्णय घेतला असून, परीक्षांच्या तारखेबाबत शुक्रवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परिक्षा तर तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे.

कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळं एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या होत्या. अनेक वर्षांपासून तयारी करत असलेले उमेदवार या परीक्षांची वाट पाहत होते. अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. एमपीएससीच्या परीक्षादेखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी या उमेदवारांकडून केली जात होती.

या परीक्षांबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अंतिम निर्णय घेतला असून परीक्षांच्या तारखांची अधीकृत घोषणा शुक्रवारी होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. तर दुय्याम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा याच वर्षी एप्रिल महिन्यात होणार आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा