मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कांदिवली पश्चिममधील महावीर नगर परिसरातील पावन धाम मंदिरात 75 खाटांचं कोरोना रुग्णालय उभारण्यात आलं आहे. या रुग्णालयात प्रत्येक बेडवर ऑक्सिजन व इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे रुग्णालय केवळ तीन दिवसांत उभारण्यात आलं आहे. तसंच हे रुग्णालय सरकारी खर्चाने नव्हे तर पोयसर जिमखाना या स्थानिक संस्थेच्या सहकार्याने बांधलं गेलं आहे.
या प्रसंगी आमदार पराग शाह, भाई गिरकर, प्रवीण दरेकर, विलास पोतनिस, सुनील राणे, मनीषा चौधरी हे मान्यवर उपस्थित होते. पावन धामचे ट्रस्टी श्री. दिनेश मोदी व नीरवभाई यांच्यासमवेत डॉ. वाडी वाला, डॉ. बिपिन दोषी, डॉ. व्रजेश शाह अशा मान्यवरांनी सुद्धा उपस्थिती लावली.
हेही वाचा -
महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या नियमांत पुन्हा बदल, मिळाली एमएमआरमध्ये प्रवासाला मुभा
'मिशन बिगीन अगेन'द्वारे नातेवाइकांसाठी सोसायट्यांचे दार उघडे