पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ७७ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (२९ ऑक्टोबर) ७७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १६५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच २ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कळंबोली आणि खारघर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ११, नवीन पनवेल १२, खांदा काॅलनी १, कळंबोली १५, कामोठे १५, खारघर २१,  तळोजा येथील येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल २२, नवीन पनवेल ४७, कळंबोली ११, कामोठे २४, खारघर ५३ तळोजा येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २३३५६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २११०२ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५४६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७०८ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत घट

नवी मुंबईत महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर


पुढील बातमी
इतर बातम्या