नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ८० रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४९ हजार ०९२ झाली आहे.
सोमवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर १२, नेरुळ २२, वाशी ६, तुर्भे ७, कोपरखैरणे १२, घणसोली ६, ऐरोली १४, दिघा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. तर १३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
सोमवारी बेलापूर ३९, नेरुळ १५, वाशी १५, तुर्भे १२, कोपरखैरणे २०, घणसोली १८, ऐरोली ८, दिघातील ९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६,६९८ झाली आहे. तर मृतांचा आकडा १००० झाला आहे. नवी मुंबईत सध्या १३९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे.
दरम्यान, एक हजारांच्यावर गेलेली नवी मुंबई पोलीस दलातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. सप्टेंबरमध्ये ५००हून अधिक असलेली उपचाराधीन रुग्णांची संख्या आता अवघ्या१३ वर आली आहे. तर पोलीस दलातील मृत्यूचे प्रमाण गेले दोन महिने शून्यावर आहे.
हेही वाचा -
११ वीची दुसरी प्रवेश यादी जाहीर
मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा होणार कमी दाबानं