नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ८८ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (१० नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन ८८ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४५,६५५ झाली आहे. 

 मंगळवारी बेलापूर २४, नेरुळ २५, वाशी ५, तुर्भे १०, कोपरखैरणे १२, घणसोली ५, ऐरोलीमध्ये ५ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात १४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ३५, नेरुळ ३७, वाशी ६, तुर्भे १२, कोपरखैरणे १९, घणसोली १२, ऐरोली १७, दिघामध्ये ५ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३,४८० झाली आहे. तर मृतांचा आकडा ९२८ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १२४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा -

मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई अधिक तीव्रतेनं करा- पालिका आयुक्त

मुंबईत बुधवारी ‘या’ ७ भागात येणार नाही पाणी


पुढील बातमी
इतर बातम्या