नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ८९ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (१६ फेब्रुवारी) कोरोनाचे नवीन ८९ रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५४ हजार १०६ झाली आहे.

नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर २८, नेरुळ १०, वाशी १२, तुर्भे ६, कोपरखैरणे १३, घणसोली ६, ऐरोली १३,  दिघा येथील १, रुग्णांचा समावेश आहे. तर ७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर १४, नेरुळ ८, वाशी १२, तुर्भे १०, कोपरखैरणे १०,  घणसोली ७, ऐरोली १५, दिघा येथील २ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२,१०७  आहे. तर मृतांचा आकडा ११०२ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ८९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरूवातीपासूनच कोरोना बाधितांवर योग्य उपचार होण्यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य सुविधा वाढीवर भर देण्यात आला. कोरोना बाधितांसाठी आवश्यकतेनुसार ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व आयसीयू बेड्सचे योग्य नियोजन करण्यात आले. 

ऑक्टोबरपासून रूग्णसंख्या कमी होत चालल्याने महानगरपालिकेच्या १० कोव्हीड केअर सेंटरमध्ये व २ डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये रूग्ण दाखल करणे तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आले. गरज भासली तर केवळ २ दिवसांत केंद्रे पुन्हा कार्यान्वित करता येऊ शकतील अशा प्रकारचे नियोजन केले आहे.


हेही वाचा -

महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांना तिसरी संधी

लसीकरणासाठी २० खासगी रुग्णालयांना परवानगी


पुढील बातमी
इतर बातम्या