पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी कोरोनाचे 'इतके' नवे रूग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ९१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. खारघर आणि नवीन पनवेल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६२२४ वर गेली आहे.

 नवीन रूग्णांमध्ये कळंबोलीतील २१, खारघरमधील १९, पनवेलमधील १८, कामोठ्यातील १४, नवीन पनवेलमधील १०, खांदा कॉलनीतील २, तळोजा वसाहतीमधील २, तसेच आसुडगाव, घोट भोईरवाडा, तळोजा आरएएफ कँप, तळोजा जेल क्वाटर्स येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.१०५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ६२२४ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ४६१८ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून १५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १४५४ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा -

ऑगस्ट महिन्यात १२ दिवस बँका बंद

पोलिसांना मिळणार हक्काचे घर

मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाची शक्यता


पुढील बातमी
इतर बातम्या