नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ९५ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ९५ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४९ हजार १८७ झाली आहे. 

मंगळवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर १८, नेरुळ २३, वाशी १५, तुर्भे ५, कोपरखैरणे ८, घणसोली ७, ऐरोली १२, दिघातील ७ रुग्णांचा समावेश आहे. तर १६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

 बेलापूर ४५, नेरुळ १६, वाशी १९, तुर्भे २०, कोपरखैरणे २१, घणसोली १७, ऐरोली २३, दिघातील २ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६,८६१ झाली आहे. तर मृतांचा आकडा १००३ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १३२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 

दरम्यान, एक हजारांच्यावर गेलेली नवी मुंबई पोलीस दलातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. सप्टेंबरमध्ये ५००हून अधिक असलेली उपचाराधीन रुग्णांची संख्या आता अवघ्या१३ वर आली आहे. तर पोलीस दलातील मृत्यूचे प्रमाण गेले दोन महिने शून्यावर आहे.

आतापर्यंत नवी मुंबई पोलीस दलातील १३४ अधिकारी, ९३१ कर्मचारी व कुटुंबीयांपैकी ६१९ असे १६८४ कोरोनाबाधित झाले होते. यामधील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबरमध्ये यापैकी ५००हून अधिक जण उपचार घेत होते. त्यानंतर पोलिसांच्या तंदुरुस्त पथकाने घेतलेली काळजी व वैद्यकीय उपचार यामुळे आक्टोबरमध्ये केवळ २६ जण उपचार घेत होते. त्यानंतर ही संख्या आणखी कमी झाली असून आता फक्त १३ जणांवर उपचार सुरू आहे.


हेही वाचा -

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, परिस्थितीही नियंत्रणात

कांदिवलीत बारवर कारवाई, आॅर्केस्ट्राच्या नावाखाली महिलांकडून अश्लील कृत्य


पुढील बातमी
इतर बातम्या