नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ९८ रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ९८ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४९ हजार ३८७ झाली आहे. 

गुरूवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर २६, नेरुळ १६, वाशी २८, तुर्भे ८, कोपरखैरणे ४, घणसोली १, ऐरोलीतील १५ रुग्णांचा समावेश आहे. तर ९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर ३२, नेरुळ ११, वाशी ८, तुर्भे १, कोपरखैरणे १५, घणसोली ११, ऐरोलीतील १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७,०४६ झाली आहे. तर मृतांचा आकडा १००७ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १३३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 

दरम्यान, वाशी येथील महापालिका सार्वजनिक रुग्णालयास पालिका आयुक्तांनी मंगळवारी अचानक भेट दिली. यावेळी पालिका सेवेत ऑनकॉलवर असलेले आठ आरोग्य अधिकारी गैरहजर असल्याचं आढळलं. या डाॅक्टरांना नोटिसा बजावण्यात आल्या असून पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

कोरोनासाठी असलेले हे रुग्णालय नुकतंच सार्वजनिक करण्यात आलं आहे. येथील आरोग्य सेवेची पाहणी आयुक्तांनी अचानक भेट देत केली. यात हजेरीपत्रक तपासताना ऑनकॉल वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. याबाबत खुलासा घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे. हजेरी पत्रकात त्यांच्या यापूर्वीच्या काळातील उपस्थितीची स्वाक्षरी नसल्याचे आढळून आले.


हेही वाचा -

कोरोना लस : सरकार लाँच करणार Co-WIN अॅप

सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलीस रोख स्वरूपातही दंड वसूल करणार


पुढील बातमी
इतर बातम्या