धारावीकरांना पावसाळी आजाराच्या बचावाचे धडे

  • मुंबई लाइव्ह टीम & सोनाली मदने
  • आरोग्य

मुंबई महानगरपालिका आणि जसलोक रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने धारावी विभागातील नागरिकांसाठी बुधवारी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. शिबिरात पावसाच्या पाण्यापासून होणाऱ्या आजारांना कसं सामोरं जायचं याचे धडे दिले.

मोफत तपासणी 

या शिबिरामध्ये धारावीतील नागरिकांची जसलोक रुग्णालयातर्फे कान, नाक, घसा आणि गेस्ट्रोची मोफत तपासणी करण्यात आली. डॉक्टर ओम श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली हे आरोग्य शिबिर पार पडलं. यावेळी एक चर्चासत्रदेखील झालं. यामध्ये धारावीतील स्थानिक रहिवासी आणि डॉक्टर यांनी एकमेकांशी संवाद साधला. पावसाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यायला हवी याची माहिती देण्यात अाली.

झोपडपट्टीमध्ये कुत्रे आणि मांजरी जास्त असल्यामुळे त्यांच्यामार्फत लेप्टो होण्याची भीती असते. अशा रोगांपासून वाचण्यासाठी आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवावं, जर शरीराची जास्त  खाज होत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं,  डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितलं.


हेही वाचा -

सावधान ! पावसाच्या पाण्यात मज्जा करताय ... मग हे वाचा

आयुर्वेदाच्या साथीने कॅन्सरवर करा मात !


पुढील बातमी
इतर बातम्या