Advertisement

पावसाच्या पाण्यात मज्जा करताय? मग हे वाचाच


पावसाच्या पाण्यात मज्जा करताय? मग हे वाचाच
SHARES

मान्सून मुंबईत दाखल झाल्याने उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र, जोरदार पावसामुळे मुंबईकर त्रस्त व्हायला लागलेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अतिवृष्टीमुळं मुंबईची "तुंबई" होत आहे. मुंबईच्या बहुतांश भागात म्हणजे दादर - हिंदमाता, सायन, धारावी , परेल, किंग्स सर्कल सारख्या अनेक ठिकाणी पाणी साचलं. मुंबईच्या मध्यभागी असलेली ही ठिकाणं पावसाच्या काही सरीतच तुडुंब भरून निघतात. गटारे, नाल्यांचे पाणीदेखील वर येऊन साचलेल्या पाण्यात मिसळतं. त्यामुळं सर्वत्र दूषित पाणी साचतं. साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरते. पावसाळ्यात डेंग्यू , मलेरिया, जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात, याची अनेकांना माहिती नसते. त्यामुळेच जलजन्य आजारांची माहिती घेणं अावश्यक अाहे.


दूषित पाण्यापासून होणारे आजार 

दूषित पाण्यापासून अनेक आजार होऊ शकतात. याची जरी साधारण लक्षणे असली तरी याचे परिणाम मात्र जीवघेणे असतात. साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होते आणि असे डास चावल्याने आणि डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या आजारांची लागण होते. थंडी, ताप, अशक्तपणा, अशी या अाजाराची लक्षणं आहेत. दूषित पाण्याने कावीळदेखील होते.

कावीळमध्ये हेपेटायटिस 'ए' किंवा 'इ' हे प्रकार अाहेत. दूषित पाणी प्यायल्यावर सात ते आठ दिवसात उलट्या, ताप, लघवी पिवळी होणं किंवा भूक मंदावणं ही लक्षणं दिसतात. टायफॉईड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो. या आजारात चार ते पाच दिवसात मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखतं. पण यावर योग्य ते उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये मृत्यूचा धोकादेखील असतो.


आजारांपासून वाचण्यासाठीचे उपाय 

  • घरातील दारं-खिडक्या बंद करून कापूर जाळा व त्याचा धूर १५-२० मिनिटं घरात राहू द्या. यामुळे घरातील डास दूर होतात
  • पावसाळ्यात पाणी पिताना ते उकळून शुद्ध करून पिणं हा सर्वोत्तम उपाय आहे
  • कावीळ झाली असेल तर आठवडाभर ऊस चावून खावा
  • सर्दी- कफ झाला असेल तर जेष्ठमध खावे
  • पाणी भरलेल्या भांड्यात तुरटी फिरवल्याने पाण्यात साचलेली माती अथवा गाळ हा तळाशी जाऊन आपल्याला स्वच्छ पाणी मिळतं.
  • पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचं पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणं टाळावं
  • रोग प्रतिकारण शक्ती वाढवण्यासाठी गरम दुधात हळद टाकून प्यावं
  • उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यावेळी मीठ- साखर पाणी सतत पित रहावं



हेही वाचा -

जाणून घेऊया ब्रेन ट्यूमर बद्दल... 

मुंबई लाईव्ह इम्पॅक्ट : सायन रुग्णालय करणार दीपाच्या मुलांचा मोफत उपचार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा