झोपडपट्ट्यांनंतर, पालिकेचं मुंबईतल्या इमारतींमध्ये लक्ष केंद्रित

एक वेळ अशी होती की मुंबईतल्या झोपडपट्ट्या कोरोनाव्हायरसच्या हॉटस्पॉट ठरत होत्या. झोपडपट्टी क्षेत्रात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव सर्वाधिक असेल अशी भिती सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होती. इमारतींमध्ये कोरोना रुग्णांची संख्या इतकी नव्हती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरणाऱ्या झोपडपट्ट्या आता कोरोना मुक्त होत आहेत. पण आता कोरोनाव्हायरसचे अधिक प्रमाण इमारतीतून म्हणजे पॉश भागात येत आहे.

पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार (बृहन्मुंबई महानगरपालिका) पॉश भागांतील COVID 19 रुग्णांच्या आकड्यात वाढ झाली आहे. अहवालानुसार एका महिन्यात अशा भागात १०८% वाढ झाली आहे. तर झोपडपट्टी भागात ६० टक्के वाढ झाली आहे.

पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात बऱ्याच गृहनिर्माण संस्थांमध्ये (हाऊसिंग सोसायटी) लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे इमारतीतील रहिवासी घराबाहेर गेले नाहीत. त्याचवेळी, घरं काम करणाऱ्या महिलांना देखील सोसायटीत प्रवेश करण्यास परवानगी नव्हती. यामुळे कोरोना पॉश भागांमध्ये पसरू शकला नाही.

हेही वाचा : 'या' रेल्वे स्थानकांवर होणार आरोग्य चाचणी

परंतु काही काळानंतर, इमारतीच्या रहिवाशांनी आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्यास सुरवात केली. यासोबतच अनेक जण मास्क न घालताच बाहेर फिरू लागले. त्यानंतर लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर बाहेर पडणाऱ्यांची संख्या आणखी वाढली.

पालिकेच्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, ९ जून रोजी कंटेंटमेंट झोनमध्ये येणाऱ्या एकूण ४ हजार ५३८ निवासी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे ८.०३ लाख लोकांना घरातच लॉकडाऊन केलं गेलं. नुकत्याच केलेल्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, आता सीलबंद इमारतींची संख्या वाढून ६ हजार २३५ झाली आहे. त्यामुळे लॉक़ाऊनमध्ये असणाऱ्या नागरिकांची संख्या वाढून ९.३३ लाखांवर गेली आहे. यापैकी एकूण २० हजार ७३५ लोक COVID 19 चे बळी पडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या इमारतींमधून केवळ एका महिन्यातच १० हजार ७७९ रुग्ण नोंदवली गेली आहेत.

महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, “ज्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण आढळत होते तिकडे अधिक लक्ष दिले गेले. त्यामुळेच आम्ही कोरोनाचा प्रसार नियंत्रित करू शकलो आहोत. तथापि, सोसोयाटी भागात अनलॉक नंतर अधिक प्रकरणं समोर येत आहेत.”


हेही वाचा

गुड न्यूज! कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश

बोरिवलीत सर्वात जास्त प्रतिबंधित इमारती

पुढील बातमी
इतर बातम्या