Advertisement

बोरिवलीत सर्वात जास्त प्रतिबंधित इमारती

गेल्या काही दिवसांपासून रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होऊ लागल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांमध्येही घट होऊ लागली आहे.

बोरिवलीत सर्वात जास्त प्रतिबंधित इमारती
SHARES

मुंबईत हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे मुंबई महा पालिकेने ११ हजारांपेक्षा अधिक इमारती आणि ५७५ झोपडपट्टया पुन्हा रुग्ण न आढळल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातून काढून टाकल्या आहेत.

मुंबईत सध्या ७०० विभाग आणि ६ हजार इमारती प्रतिबंधित आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रात ५२ लाख लोक राहत आहेत. बोरिवली भागात सर्वात जास्त  ७७७ प्रतिबंधित इमारती आहेत. तर कुर्ला, देवनार-मानखुर्द, भांडुप, अंधेरी पश्चिममध्ये सर्वाधिक प्रतिबंधित  वस्त्या आहेत. अंधेरी पूर्व, कांदिवली, मुलुंड, मालाड, घाटकोपरमध्येही प्रतिबंधित इमारतींची संख्या अधिक आहे.  


लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर इमारतीतील रुग्ण वाढू लागले. त्यामुळे प्रतिबंधित इमारतींची संख्या हजारोंच्या घरात गेली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होऊ लागल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांमध्येही घट होऊ लागली आहे.


प्रतिबंधित इमारती - ६००३

इमारतीतील घरे - २.५ लाख

लोकसंख्या - ९.२ लाख

प्रतिबंध हटवलेल्या इमारती -११,५९१


प्रतिबंधित भाग

कुर्ला –७७

देवनार, गोवंडी – ७५

भांडुप विक्रोळी – ६८

अंधेरी पश्चिम —५८

मुलुंड — ४८


प्रतिबंधित इमारती

बोरिवली–७३०

अंधेरी पूर्व — ६६७

कांदिवली – ५५१

मुलुंड– ४९९



हेही वाचा -

Containment Zones List Thane : ठाणेमध्ये 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन

मुंबईत ६९१ इमारती सील, 'ही' आहे यादी




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा