मुंबईतील 'हे' ७ विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट

मुंबईतील कोरोनाचा उद्रेक चिंताजनक बनला आहे. रोज झपाट्याने रुग्ण संख्या वाढत आहे. सरासरी रोज मुंबईत १० हजार नवे कोरोना रुग्ण वाढत आहेत. मार्च महिन्यापासून वाढणारी रुग्णसंख्या एप्रिलमध्येही धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. 

मुंबईतील अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, घाटकोपर, वांद्रे, मुलुंड, मालाड हे सात विभाग कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरले आहेत. या विभागातील रुग्णसंख्या तीन दिवसांत प्रत्येकी एक ते दोन हजारांवर गेली आहे. या विभागात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्ण दुपटीचा कालावधी घटला आहे. चेंबूर, कांदिवली, वांद्रे, अंधेरी येथील रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वाधिक कमी म्हणजे अवघ्या ३२ दिवसांवर आला आहे.

मुंबईत गुरूवारी ८९३८ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. तसंच ४५०३जणांनी कोरोनावर मात केली. मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता ४,९१,६९८ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ११,८७४ इतका झाला आहे.

मुंबईत झोपडपट्टी, चाळींच्या तुलनेत इमारतीत ८० टक्के रुग्ण सापडत आहेत. पालिकेने पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळणा-य़ा सोसायट्या मायक्रो कंटेनमेंट म्हणून घोषित केल्या आहेत. यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. क्वारंटाइनचे नियम मोडणार्‍यांची पालिकेकडे तक्रार करणे, स्क्रिनिंग, ऑक्सिजन पातळी मोजणे, बाहेरील व्यक्तीस प्रवेश बंदी, जीवनावश्यक वस्तू सोसायटीच्या गेटवर स्वीकारणे, पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती प्रशासनाला द्यावी अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. कोरोनाचे नियम मोडणा-या सोसायट्या व संबंधित व्यक्तींवर कड़क कारवाई केली जाणार आहे.

सर्वाधिक रुग्ण असलेले विभाग

अंधेरी (प) – २२५३

कांदिवली – २०१०

गोरेगाव – १६०५

वांद्रे – १३३३

घाटकोपर – १५३६

मालाड – १७५०

मुलुंड – १३७९



हेही वाचा -

कोरोना निर्बंधांविरोधात हॉटेलचालकांचं राज्यव्यापी आंदोलन

दुकानं सुरू करण्याचा निर्णय ३ दिवस लांबणीवर

पुढील बातमी
इतर बातम्या