Advertisement

दुकानं सुरू करण्याचा निर्णय ३ दिवस लांबणीवर

कोरोनाची साखळी तोडण्याकरिता जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व दुकाने ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाला व्यापाऱ्यांनी विरोध केलो आहे.

दुकानं सुरू करण्याचा निर्णय ३ दिवस लांबणीवर
SHARES

कोरोनाची साखळी तोडण्याकरिता जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व दुकाने ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाला व्यापाऱ्यांनी विरोध केलो आहे. त्यानुसार, शुक्रवारपासून सर्व दुकानं सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र चेंबर अ‍ॅफ कॉमर्सने दिला होता. परंतु मुख्यमंत्र्यांच्या आवाहनामुळं सोमवारपासून सर्व दुकानं सुरू केली जातील, असं अध्यक्ष संतोष मंडलेचा व उपाध्यक्ष ललित गांधी यांनी जाहीर केले.

सरकारनं दुकानं बंद ठेवण्याचा आदेश दिला तरी शुक्रवारपासून सर्व दुकानं सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांच्या संघटनेने हा निर्णय ३ दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसारच शुक्रवारी दुकानं सुरू करण्याचं आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. याऐवजी सोमवारपासूनरर्व दुकाने सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

गुरुवारी ८९३८ नव्या रुग्णांची नोंद झाली तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ४८ हजार ९०२ चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत बाधितांचे प्रमाण १८.२७ टक्के  आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ८६ हजारांच्यापुढे गेली आहे, तर रुग्णदुपटीचा कालावधी एक महिन्यावर आला आहे.

मुंबईत गुरुवारी ८९३८ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या चार लाख ९१ हजार ६९८ झाली आहे. एका दिवसात चार हजार ५०३ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत तीन लाख ९२ हजार ५१४ म्हणजेच ८० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त रुग्णांची संख्या फेब्रुवारीत ९४ टक्क्यांवर होती. मात्र रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे हा दरही आता कमी झाला आहे.

मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत असून सध्या ८६ हजार २७९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ६७ हजार ५५० रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर १३,१९६ रुग्णांना लक्षणे आहेत. गंभीर रुग्णांची संख्या एक हजाराच्यापुढे गेली आहे.



हेही वाचा -

जाणीवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबात चुकीच्या बातम्या का?

कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींबाबत संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा