उच्च वस्तीत आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये महापालिकेची जनजागृती मोहीम

मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील कोरोना नियंत्रणात आणण्यात महापालिकेला यश आलं आहे. आता माहापिलेकनं आपलं लक्ष उच्च वस्तीत आणि गृहनिर्माण सोसायटींकडे केंद्रीत केलं आहे. उच्च वस्तीत आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये जवळपास ८० टक्के रुग्णांची नोंद झाली आहे. हे लक्षात घेता महापालिकेनं या भागांमध्ये जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

ए वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितलं की, "बहुतेक प्रकरणं उच्च वस्तीतील आहेत. त्यामुळे आता इमारतीतील रहिवाशांनी व्हायरस दूर ठेवण्यासाठी पावलं उचलावीत. त्यामुळे आता पालिकेनं देखील पोस्टर्स लावून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे."

या पोस्टर्समुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चुकिच्या माहितीला चाप बसेल. शिवाय नागरिकांना योग्य माहिती मिळण्यास मदत होईल. पालिकेनं या पोस्टर्सवर वॉर्डनसार हेल्पलाईन नंबर देखील दिला आहे. जेणेकरून COVID 19 संबंधित कोणत्याही समस्यांबाबत रहिवासी योग्य माहितीसाठी संपर्क साधू शकतात.

हेही वाचा : बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाडमध्ये 'इतके' आहेत कोरोना रूग्ण

महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, “देशभर कोरोना आजारांशी लढण्यासाठी जनजागृती मोहिमेची फार मदत होत आहे. सोशल मीडियावर हजारो मेसेजेस असतानाही लोकांना वस्तुस्थितीची माहिती नसते. ही पोस्टर्स लोकांना खबरदारी घेण्यास भाग पाडतील. त्यामुळे विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल."

गृहनिर्माण संस्थांनी स्वच्छता ठेवणं, तपासणी तसंच इमारतीमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ऑक्सीजन पातळी तपासणे आदी नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. विषाणूची लागण होऊ नये म्हणून अने सोसायटी अशा खबरदारी घेत आहेत.

याशिवाय दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नियमितपणे स्वच्छता करणं, टूथपिकप्रमाणे डिस्पोजेबल स्टिकनं लिफ्टचे बटण प्रेस करणं, डोरबेल्स, हँडल्स यांना हात न लावणं असे नियम लागू करणं आवश्यक आहे. तर काही इमारतींमध्ये हे नियम लागू करण्यात आले आहेत.

नियमांचे उल्लंघन होऊ नये याची जबाबदारी त्या सोसायटींनी घेणं आवश्यक आहे. सोसायटीतील रहिवासी नियम पाळत नसतील तर त्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. याशिवाय मजला सील असेल तर त्या क्षेत्रात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.


हेही वाचा

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे 'इतके' आढळले रुग्ण

बोरिवलीतल्या 'या' चार रुग्णालयात कोरोना रुग्णांवर होणार नाहीत उपचार

पुढील बातमी
इतर बातम्या