Advertisement

बोरिवलीतल्या 'या' चार रुग्णालयात कोरोना रुग्णांवर होणार नाहीत उपचार

बोरिवलीतल्या या चार रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास पालिकेकडून बंदी गालण्यात आली आहे. जाणून घ्या त्यामागचं कारण...

बोरिवलीतल्या 'या' चार रुग्णालयात कोरोना रुग्णांवर होणार नाहीत उपचार
SHARES

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. तर काहींनी तक्रार केली आहे की, अनेक खासगी रुग्णालये कोरोनाच्या नावाखाली उपचारासाठी मनमानी बिल लावत आहेत. लोकांकडून आलेल्या तक्रारींवरून पालिकेनं कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पालिकेनं बोरिवलीतील चार खासगी रुग्णालयांना कोरोना रूग्णांवर उपचार करण्यास बंदी घातली आहे.

मुंबई मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पालिकेनं बोरिवलीच्या चंदावरकर रोड आणि भभई भागात स्थित अ‍ॅपेक्स हॉस्पिटल, गोराई येइथलं मंगल मूर्ती रुग्णालय आणि बोरिवलीतील धनश्री हॉस्पिटल यापुढे कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करू शकत नाहीत. पालिकेनं सांगितलं की, या हॉस्पीटल विरोधात लोकांच्या अनेक तक्रारी होत्या.

अनेकांनी पालिकेकडे तक्रार केली की, मनमानी कारभार करत कोरोनाच्या रुग्णांना अधिक बिलदिलं जायचं. याशिवाय, पालिका आणि प्रशासनानं जारी केलेल्या नियमांचं पालन करण्यात देखील ही हॉस्पीटल अपयशी ठरली. त्यामुळे या हॉस्पीटल्सवर बंदी घालण्यात आल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.



हेही वाचा

मुंबईत आतापर्यंत 'इतके' कोरोना रुग्ण झाले बरे

बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाडमध्ये 'इतके' आहेत कोरोना रूग्ण

दादर, माहीमकरांसाठी मोफत कोरोना तपासणी केंद्र

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा