Advertisement

ऑगस्टपासून सिनेमागृह उघडण्याची शक्यता, मात्र शाळा-कॉलेजेस राहणार बंद

नलॉक प्रक्रियेत सिनेमागृह चालू ठेवण्यात येऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. पण यासंदर्भात अजून कुठली अधिकत घोषणा केली गेली नाही.

ऑगस्टपासून सिनेमागृह उघडण्याची शक्यता, मात्र शाळा-कॉलेजेस राहणार बंद
SHARES

देशातील कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशात १ ऑगस्टपासून अनलॉक 3 जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भात सरकारचा विचार विनिमय चालू आहे. अनलॉकमध्ये अद्याप कोणतीही सवलत अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. तरी अनलॉक प्रक्रियेत सिनेमागृह चालू ठेवण्यात येऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

१ ऑगस्टपासून किंवा ३१ ऑगस्टच्या आसपास सिनेमागृह पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. त्यासाठी नियमावली देखील बनवण्यात आली आहे. ज्याअंतर्गत एक सीट सोडून बसण्याच्या व्यवस्था करण्यात येऊ शकते. शिवाय पूर्ण एक रो सोडून दुसऱ्या रोमध्ये बसण्याची व्यवस्था केली जाऊ शकते.

हेही वाचा : सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास अशक्यच, आर्थिक खर्चाच चढता क्रम कायम

शाळा आणि महाविद्यालयं सध्या बंद राहतील. त्याचबरोबर, जिम आणि स्विमिंग पूल देखील सध्या बंद राहण्याची शक्यता आहे. यासह मेट्रो आणि लोकल सेवा देखील सुरू होण्याची शक्यता कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे ४८ हजार ६६१ नवीन रुग्ण आढळले आहेत. आणि ७०५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १३ लाख ८५ हजार ५२२ वर गेली आहे. यामध्ये ४ लाख ६७ हजार ८८२ रुग्ण अक्टीव्ह आहेत. ८ लाख ८५ हजार ५७७ लोकांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ३२ हजार ०६३ लोकांचा मृत्यू झाला आहे.



हेही वाचा

लॉकडाउनच्या काळात अवैध मद्यविक्री प्रकरणी 'इतके' गुन्हे दाखल

अनलाॅकनंतर पुन्हा लाॅकडाऊन, पण रुग्णांची संख्या वाढतीच

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा