Advertisement

लोकल, मोनो, बेस्टचा प्रवास एकाच अ‍ॅपवर

एमएमआरडीएनं अखेर सल्लागार नियुक्तीचा निर्णय घेत या कामाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकल, मोनो, बेस्टचा प्रवास एकाच अ‍ॅपवर
SHARES

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना एकाच तिकिटीवर लोकल, मेट्रो, मोनो, बेस्ट बस आणि ओला-उबरसारख्या खासगी टॅक्सीनं प्रवास करता येणार आहे. यासाठी एकात्मिक तिकिटीकरण पद्धतीची लगबग सुरू झाली असून, एमएमआरडीएनं अखेर सल्लागार नियुक्तीचा निर्णय घेत या कामाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या कानाकोपऱ्यात प्रवासी सेवा देणाऱ्या बेस्टसह महानगरांत ७ पालिकांच्या स्वतंत्र बस सेवा आहेत.

मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी ये-जा करत असतात. तसंच, टॅक्सीसह ओला, उबर यांसारख्या खासगी टॅक्सी सेवाही आहेत. या सर्व प्रवासी सेवांमधून प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेले तिकीट एकाच अ‍ॅपच्या माध्यमातून काढता यावे, हा या प्रणालीचा उद्देश आहे. एमएमआरडीएच्या हद्दीत सध्या कार्यान्वित असलेल्या रिलायन्सच्या मेट्रोसह एमएमआरडीए आणि एमएमआरसीएलच्या मेट्रो प्रकल्पांचे ३४० किमी लांबीचे जाळे विस्तारणार आहे.

असा होणार प्रवास

  • ही तिकीट प्रणाली स्मार्ट कार्डच्या स्वरूपातली असेल. 
  • कुठूनही किंवा ऑनलाइन पद्धतीने रिचार्ज करता येईल. 
  • पेमेंट अॅपच्या धर्तीवर थेट बँक खात्यांमधूनही तिकिटांची रक्कम अदा करता येईल. 

भविष्यातील प्रवासी भाड्यासाठी अनुकूल धोरण तयार करून संपूर्ण प्रणालीची रूपरेषा ठरविण्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सी डॅक या कंपनीकडून त्यासाठीचे नियोजन दिले जाणार होते. परंतु, त्यांच्या प्रतिसादाची वाट न पाहता एमएमआरडीएनं हे काम मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

लॉकडाऊनच्या काळात या प्रणालीबाबत प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सविस्तर चर्चा केली असून, त्यानंतर सल्लागार नियुक्तीचा निर्णय झाल्याचं स्पष्ट केलं. क्यूआर कोडच्या माध्यमातून रांगा न लावता तिकीट मिळणार असल्याने प्रवाशांच्या वेळेत बचत होईल. तसंच, तिकीट व्यवस्थेवरील खर्चातही कपात होणार असल्याचं समजतं.



हेही वाचा -

Exclusive मुंबईतल्या ९४ पोलिस ठाण्यात होणार ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’

यंदा ढोल-ताशांचा आवाज म्यूट!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा