Advertisement

बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाडमध्ये 'इतके' आहेत कोरोना रूग्ण

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेने मालाड, कांदिवली, बोरीवली, दहीसर या भागांत डोर टू डोर स्क्रीनिंग आणि स्मार्ट हेल्मेट स्क्रीनिंग देखील सुरू केली गेली आहे.

बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाडमध्ये 'इतके' आहेत कोरोना रूग्ण
SHARES

मुंबई कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या १,०९,०९६ वर पोहोचली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात कोरोनाची रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेने मालाड, कांदिवली, बोरीवली, दहीसर या भागांत डोर टू डोर स्क्रीनिंग आणि स्मार्ट हेल्मेट स्क्रीनिंग देखील सुरू केली गेली आहे. सध्या मालाडमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. बीएमसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २५ जुलैपर्यंत मालाडमधील कोरोना रुग्णांची संख्या ६५८३ वर गेली आहे. तर दहिसरमध्ये २६ जुलैपर्यंत कोरोनाचे २६१६ रूग्ण आढळले आहेत. २६ जुलैपर्यंत बोरिवलीमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९९४ वर पोहोचली आहे. तर २५ जुलैपर्यंत कांदिवली मधील कोरोना रूग्णांची एकूण संख्या ४७८० झाली आहे.


मुंबईत रविवारी १११५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या १,०९,०९६ झाली आहे. तर रविवारी ५७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ६०९० वर पोचला आहे. मुंबईत रविवारी एका दिवसात १३६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. 



हेही वाचा

लॉकडाउनच्या काळात अवैध मद्यविक्री प्रकरणी 'इतके' गुन्हे दाखल

अनलाॅकनंतर पुन्हा लाॅकडाऊन, पण रुग्णांची संख्या वाढतीच




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा