Advertisement

दादर, माहीमकरांसाठी मोफत कोरोना तपासणी केंद्र

मुंबई महापालिकेला जी उत्तर विभागातील धारावीमधील कोरोनाचा फैलाव रोखण्यात यशं आलं आहे. मात्र, दादर आणि माहीममध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.

दादर, माहीमकरांसाठी मोफत कोरोना तपासणी केंद्र
SHARES

दादर आणि माहीममधील रहिवाशांना आता कोरोनाची मोफत चाचणी करता येणार आहे. मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाने दादरमधील कोहिनूर सार्वजनिक वाहनतळाच्या तळमजल्यावर मोफत कोरोना तपासणी केंद्र सुरू केलं आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांची या ठिकाणी चाचणी करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेला जी उत्तर विभागातील धारावीमधील कोरोनाचा फैलाव रोखण्यात यशं आलं आहे. मात्र, दादर आणि माहीममध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे जाणवणाऱ्या दादर, माहीममधील रहिवाशांना एकाच ठिकाणी कोरोना तपासणी केंद्र उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.  कोहिनूर सार्वजनिक वाहनतळाच्या तळमजल्यावर हे केंद्र सुरू केलं आहे.

या केंद्रावर येथील रहिवाशांना थेट जाता येणार नाही. तपासणीसाठी जाण्यापूर्वी जी-उत्तरमधील वॉर रुमशी संपर्क साधणं बंधनकारक आहे. त्यानंतर त्याचं नाव तपासणी केंद्रावर कळविण्यात येणार आहे. वॉर रुमशी संपर्क साधल्याशिवाय तेथे कोणाचीही तपासणी करण्यात येणार नाही. या केंद्रावर जाताना  दादर, माहीम परिसरातील पत्ता असलेलं आपलं आधारकार्ड घेऊन जाणं अनिवार्य आहे.

जी-उत्तर विभाग वॉर रुम क्रमांक – ०२२-२४२१०४४१



हेही वाचा

लॉकडाउनच्या काळात अवैध मद्यविक्री प्रकरणी 'इतके' गुन्हे दाखल

अनलाॅकनंतर पुन्हा लाॅकडाऊन, पण रुग्णांची संख्या वाढतीच



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा