कोरोनाविरोधातील लढ्यासाठी पालिकेचे ‘मिशन झिरो’, 'असा' आहे नवा अ‍ॅक्शन प्लॅन

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.  मुंबई महापालिका कोरोनाविरोधातील लढ्यात युद्धपातळीवर काम करत आहे. कोरोनाच फैलाव रोखण्यासाठी पालिकेने आता नवी अ‍ॅक्शन प्लॅन हाती घेतला आहे. ‘मिशन झिरो’ ही संकल्पना पालिका राबवणार आहे. अंधेरीच्या शहाजीराजे भोसले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पालिकेने मिशन झिरो लाँच केला आहे.

मुंबईतील सहा विभागांमध्ये मिशन झिरो राबवण्यात येणार आहे. यानुसार दोन ते तीन आठवड्यात रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ५० फिरत्या दवाखान्यांची (मोबाइल व्हॅन) व्यवस्था करण्यात येणार आहे. भांडुप , मुलुंड, बोरिवली, दहिसर, मालाड, कांदिवली या भागांचा मिशन झिरोमध्ये समावेश आहे. या सर्व परिसरातील रुग्णदुपटीचा कालावधी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या मोबाइल व्हॅन) तेथे रुग्णांची तपासणी करणार आहेत.  तसंच कोरोना संशयित रुग्णांना त्वरीत वेगळे करुन त्यांची कोरोना चाचणी टेस्ट केली जाणार. मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी ३६ दिवसांवरुन ५० दिवसांवर नेण्याचं लक्ष्य पालिकेने ठेवलं आहे

 मुंबईत रविवारी १२४२ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ६६,५०७ वर गेला आहे. तर मृतांची संख्या ३६६९ वर गेली आहे. रविवारी ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३३,४९१ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईसध्या तर २९,३४७ सक्रीय रुग्ण आहेत.


हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईतील 'इतक्या' इमारती पुन्हा पुर्वरत

कोरोना मृतांमध्ये ५० वर्षांवरील सर्वाधिक रुग्ण


पुढील बातमी
इतर बातम्या