कस्तुरबा रुग्णालयाला मिळणार बळकटी, २ कोटींची तरतूद

कोरोना व्हायरस (सारख्या संसर्गजन्य आजाराची साथ आली, तर त्याचे निदान, वैद्यकीय निष्कर्ष तातडीने मिळावेत, यासाठी मुंबई महापालिकेच्या ( कस्तुरबा रुग्णालयाचे ( बळकटीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कस्तुरबा रुग्णालयाच्या आवारामध्ये नवीन इमारत नियोजित आहे. त्यासाठी पालिका अर्थसंकल्पात ७ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावीत आहे. 

कस्तुरबा रुग्णालयाच्या (आवारामध्ये सुसज्ज अशी तीन मजली इमारती उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये १४० खाटा असतील. अशा प्रकारची ही पहिली विलगीकरण करण्यात आलेली इमारत असेल, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून रुग्णाला दूर ठेवता येईल.  अद्ययावत चाचण्या कस्तुरबा रुग्णालयात करणे शक्य होणार आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या वास्तूमध्येही काही नवे वैद्यकीय उपक्रम राबवण्यात येणार आहेत. करोना विषाणूच्या चाचण्याही येथे सुरू करण्यात येणार आहेत. रक्त आणि संसर्गाचे अन्य नमुने घेऊन वैद्यकीय नमुन्यांआधारे प्राथमिक चाचण्यांचे काम सुरू करण्यात येणार आहे. रुग्णाला विलगीकरण कक्षामध्ये ठेवल्यानंतर एकाकी वाटू नये, यासाठी विरंगुळ्याची साधनेही असतील.

आजारांच्या नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेच्या (यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. क्षय, एड्स, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिससारख्या संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध व बालकांच्या १०० टक्के लसीकरणाची निश्चिती हे २०३० पर्यंतचे लक्ष्य आहे. २०१८च्या तुलनेत गेल्या वर्षी मलेरियामध्ये १३.४८ , डेंग्यूमध्ये ८.२७ टक्के तर एचआयव्हीमध्ये ३०.४६ टक्के घट झाल्याचे महापालिका प्रशासनाने नमूद केले आहे. पश्चिम - पूर्व उपनगरातील सहा रुग्णालयांमध्ये डी.एन.बी अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. या अभ्यासक्रमासाठी पूर्ण वेळ कंत्राटी तज्ज्ञ वैद्यकीय सल्लागारांच्या नेमणुका करण्यात येतील.


हेही वाचा -

कोरोनावर उपचाराचे व्हायरल मेसेज खोटे

आर्थिक उत्पनाच्या कमतरतेमुळं महापालिकेची नोकरभरती बंद


पुढील बातमी
इतर बातम्या