Lung Cancer Cause: फुफ्फुसाचा कर्करोग किती ठरू शकतो भयानक?

प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त सध्या फुफ्फुसाच्या कर्करोगाचा सामना करत आहे. त्याला थर्ड स्टेजचा लंग कॅन्सर सांगितला आहे. पहिल्या स्टेजमध्ये शरीराच्या एखाद्या भागातील पेशी दुप्पट किंवा चौपट वेगाने वाढू लागतात. आॅपरेशनच्या माध्यमातून कॅन्सर झालेला भाग काढून टाकता येतो. परंतु सेकंड किंवा थर्ड स्टेजमध्ये ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होते. (bollywood actor sanjay dutt diagnosed with third stage lung cancer know its facts) 

स्मोकिंग म्हणजे धूम्रपान हे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण मानलं जातं. फुफ्फुसाच्या कॅन्सरने दगावणारे अंदाजे ८० टक्के रुग्ण हे धूम्रपान करणारेच असतात. सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण १५ ते ३० टक्क्यांहून अधिक असतं. जे रुग्ण कॅन्सरवरील उपचारानंतर धूम्रपान करणं सोडून देतात, ते या आजारातून बरे देखील होतात. धूम्रपान न करता केवळ धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून देखील कॅन्सरचा धोका कायम असतो. कारण धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात देखील थेट तंबाखूचा धूर जात असतो. एका सर्वेक्षणानुसार जगातिक प्रत्येक चौथी व्यक्ती दुसऱ्याने केलेल्या धूम्रपानाचा बळी ठरत आहे.  

हेही वाचा - संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी जाणार...

धूम्रपानासोबतच वायू प्रदूषणामुळेही फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. वायू प्रदूषणातील सल्फेट, एअरोसाॅल फुफ्फुसावर वाईट परिणाम करतात. शिवाय चुलीवर जेवण बनवताना लाकडाचा धूर, गोवऱ्यांचा धूर यामुळेही फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. परंतु त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. फुफ्फुसाला धूम्रपानामुळेच मोठी हानी पोहोचते. रेडीएशन थेरपीनंतरही कॅन्सरच्या पेशी वाढू शकतात. त्यामुळे चांगली जीवनशैली हाच यावरील उपाय आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता संजय दत्तला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. पण आता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे.

८ ऑगस्टला संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल केलं होतं. लीलावती रुग्णालयात दाखल करताच त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. परंतु चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर त्याच्या इतर चाचण्या करण्यात आल्या. त्यातून त्याला कर्करोगाचं निदान करण्यात आलं. संजय दत्तवर पुढे अमेरिकेत उपचार होणार आहेत.

 हेही वाचा - संजय दत्तने दिल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा, म्हणाला...

पुढील बातमी
इतर बातम्या