सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचा पुढाकार, प्रवाशांना पुरवणार मोफत सेनिटायझर्स

अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना केल्वेनं प्रवास करण्याची अनुमती आहे. आता त्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. त्याच एक भाग म्हणजे मध्य रेल्वेनं (CR) खासगी हँड सॅनिटायझर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीशी करार केला आहे. सीआरच्या मार्गात प्रवास करणार्‍यांसाठी ही सेवा मोफत पुरवली जाणार आहे.

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR)चा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत स्थानिक किंवा बाहेरील गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना सेनिटायजर्स वितरीत करण्यात येतील. तर त्यांच्या सामानावर फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण केलं जाईल.

याशिवाय यात रेल्वे तिकिट बुकिंग काउंटरवर सुरक्षितता राखण्यासाठी आसपासच्या भागांचे निर्जंतुकीकरण करणं समाविष्ट आहे. रेल्वे स्थानकांवर किंवा रेल्वेमध्येसोशल डिस्टनसिंग राखणं कठिण आहे. कारण रेल्वे गर्दीनं भरलेली असते. त्यामुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी हे चिंतादायक आहे. पण रेल्वे यातूनही काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.


हेही वाचा : क्यूआर कोड पास नसेल, तर लोकल प्रवेश नाही; 'परे'च्या स्थानकांवर उद्घोषणा


अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), कल्याण आणि कर्जत रेल्वे स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये हँड सेनिटायझर्स दिसतील. याव्यतिरिक्त, हे सेनिटायझर्स हार्बर लाइन रेल्वे स्थानकांवर देखील दिसतील.

लोकलनं प्रवास करणाऱ्या लोकांच्या सुरक्षतेसाठी रेल्वे प्रषासन योग्य ती खबरदारी घेत आहे. प्रवाश्यांसाठी वातावरण सुरक्षित आहे हे सुनिश्चित करण्यासाठी दर दोन तासांनी शहरातील लोकल गाड्या स्वच्छ केल्या जात आहेत. सध्या मुंबईच्या लोकल गाड्या काही सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी चालवल्या जात आहेत.


हेही वाचा

अखेर डहाणू ते चर्चगेट लोकल रुळावर, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना दिलासा

विरार-डहाणू २ जादा मेमू, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा

पुढील बातमी
इतर बातम्या