Advertisement

क्यूआर कोड पास नसेल, तर लोकल प्रवेश नाही; 'परे'च्या स्थानकांवर उद्घोषणा


क्यूआर कोड पास नसेल, तर लोकल प्रवेश नाही; 'परे'च्या स्थानकांवर उद्घोषणा
SHARES

जून महिन्याच्या १५ तारखेपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या आयडीची पडताळणी करूनच त्यांना लोकलमध्ये प्रवेश दिला जात होता. त्यानुसार, पश्चिम रेल्वेवर २० जुलैपासून लोकल प्रवास करण्याआधी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड असलेला पास बंधनकारक असणार आहे. क्यूआर कोड पास नसेल, तर लोकल प्रवेश मिळणार नाही, अशी माहीती पश्चिम रेल्वेने दिली.

याबाबत उद्घोषणा पश्चिम रेल्वेच्या स्थानकात होऊ लागली आहे. मध्य रेल्वेवरही क्यूआर कोड पासाची अंमलबजावणी लवकरच होणार असून त्याची तारीख मात्र गुलदस्त्यातच आहे. राज्य सरकारी कर्मचारी, पालिका कर्मचारी, पोलीस, रुग्णालय कर्मचारी, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मध्य व पश्चिम रेल्वेवर प्रत्येकी ३५० लोकल फेऱ्या चालवल्या जात आहे. १५ जूनपासून सुरू झालेल्या या सेवेत पश्चिम रेल्वेवरुन सर्वाधिक १ लाख ३० हजार प्रवासी प्रवास करु लागले आहेत. तर मध्य रेल्वेवर हाच आकडा ७० हजारापर्यंत आहे.

सध्या या प्रवाशांना कार्यालयीन ओळखपत्रावरच लोकलचे तिकीट व पास उपलब्ध करुन प्रवास दिला जात आहे. परंतु अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु होण्याआधी क्यूआर कोड पास स्कॅन करुन स्थानकात प्रवेश दिल्यानंतर नेमका प्रवासी समजू शकेल व अन्य कोणत्याही प्रवाशाला प्रवास देणं शक्यही होणार नाही की घुसखोरीही होण्याची शक्यता नसेल.

पश्चिम रेल्वेने २० जुलैपासून क्यूआर कोड पासची अंमलबजावणी सर्व स्थानकात करण्याचा निर्णय घेतला असून, तो पास नसेल तर लोकल प्रवास करता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. तशा उद्घोषणाही पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकात करण्यात येत आहेत. हे पास राज्य सरकारी कर्मचारी, पालिका, पोलीस, केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यालयाकडून उपलब्ध होणार आहे.हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement