कोविन पोर्टलमध्ये करण्यात आले हे नवीन बदल, जाणून घ्या प्रक्रिया

कोरोना प्रतिबंधक लसीसाठी कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. काही दिवसांपासून कोविन पोर्टल योग्यरित्या चालत नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. या तक्रारीनंतर आता यात बदल करण्यात आले आहेत.

लसीकरणासाठी कोविन पोर्टलवरून ज्यांनी लसीकरणासाठी वेळ घेतला होता, पण काही कारणास्तव त्यांना लस घ्यायला जाता आले नाही. अशांना लस घेल्याचे मेसेज येऊ लागले. या तक्रारीनंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं पोर्टलमध्ये बदल केले.

काय आहेत नवीन बदल?

व्हक्सीन रजिस्ट्रेशननंतर तुम्ही अपॉइंटमेंट बुक केली, तर तुमच्या मोबाइल नंबरवर ४ अंकी OTP येईल. या OTP ला लसीकरण केंद्रावर दाखवावा लागेल. या ओटीपीद्वारे तुम्ही अपाइंटमेंट घेतल्याचं सिद्ध होईल. यामुळे व्हॅक्सीनेशच्या डेटामध्येही काही गडबड होणार नाही.

बदल का केला?

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. यात सांगण्यात येत होतं की, ज्यांनी अपॉइंटमेंट बुक केली, पण लस घेतली नाही. अशा लोकांना लस घेतल्याचे मेसेज येऊ लागले आणि त्यांचे लसीकरणाचे प्रमाणपत्रदेखील जारी होऊ लागले. या तक्रारीनंतर मंत्रालयानं या पोर्टलमध्ये बदल केले. यानुसार, आता ओटीपीद्वारे लस घेतल्याची पुष्टी होईल.

पोर्टलवमधील इतर बदल?

OTP शिवाय कोविन पोर्टलच्या डॅशबोर्डमध्येही बदल करण्यात आले आहेत. आता अपॉइंटमेंट घेण्यासाठी पिनकोड किंवा जिल्ह्याचं नाव टाकल्यानंतर ६ नवे ऑप्शन ओपन होतील. या पर्यायांमधून वयोगट (18+ किंवा 45+), व्हॅक्सीनचा प्रकार (कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिन), फ्री किंवा पेड व्हॅक्सीन निवडू शकता. या बदलानंतर आता तुम्हाला कोणती व्हॅक्सीन घेतली, याची माहितीदेखील मिळेल.

नवीन रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे?

  • सर्वात आधी मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून http://cowin.gov.in या कोविन पोर्टलवर जा.
  • तुमच्या स्क्रीनच्या उजब्या बाजुला Register / Sign In Yourself वर क्लिक करा.
  • तुमचा मोबाइल नंबर एंटर करून Get OTP पर क्लिक करा.
  • मोबाइलमध्ये आलेलाल OTP एंटर करुन वेरिफाय करा.
  • यानंतर व्हॅक्सीनसाठी रजिस्टर करून तुमचा फोटो आयडी प्रूफ, नाव, जेंडर आणि जन्मतारीख टाका.
  • रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लसीकरणासाठी अपॉइंटमेंट घ्या.


हेही वाचा

संपूर्ण मुंबईत होणार ड्राईव्ह इन लसीकरण; तुमचं सेंटर जाणून घ्या!

आता Whatsapp वर मिळवा लसीकरण केंद्रांची माहिती, जाणून घ्या प्रक्रिया

पुढील बातमी
इतर बातम्या