Advertisement

संपूर्ण मुंबईत होणार ड्राईव्ह इन लसीकरण; तुमचं सेंटर जाणून घ्या!

महापालिकेच्या या निर्णयामुळं ज्येष्ठ व दिव्यांगांची मोठ्या त्रासातून सुटका होणार आहे.

संपूर्ण मुंबईत होणार ड्राईव्ह इन लसीकरण; तुमचं सेंटर जाणून घ्या!
SHARES

लसीकरण केंद्रावर नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता आता मुंबईतील १४ मोठी मैदाने व स्टेडियमवर 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन' सुरु करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळं ज्येष्ठ व दिव्यांगांची मोठ्या त्रासातून सुटका होणार आहे. दादर येथील कोहिनूर मिलच्या पार्किंग क्षेत्रात 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन' ला दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना उत्तम प्रतिसाद मिळाला. परंतु रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ लागल्यानं मुंबई वाहतूक पोलिसांनी तत्काळ कोहिनूर पार्किंग क्षेत्रातील लसीकरण केंद्र बंद करण्याच्या सूचना मुंबई महापालिका प्रशासनाला केल्या.

वाहतूक विभागाच्या सूचनेचं पालन करत येथील लसीकरण केंद्र बंद करण्यात आले. परंतु दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी १४ मोठी मैदाने व स्टेडियमवर 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन' सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं. महापालिकेच्या जी उत्तर विभागातील शिवाजी पार्क जवळील कोहिनूर स्केअरच्या पार्किंग क्षेत्रात 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन' सेंटर सुरु केले.

महापालिकेच्या या उपक्रमाला दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परंतु पार्किंग क्षेत्रात लसीकरण केंद्र सुरु केल्यानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. अखेर वाहतूक पोलिसांनी लसीकरण केंद्र बंद करण्याची सूचना पालिकेला केली. त्यानंतर येथील लसीकरण केंद्र बंद करत १४ मोठी मैदाने व स्टेडियमवर 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे चहल यांनी स्पष्ट केलं.

या ठिकाणी होणार लसीकरण

  • अंधेरी स्पोर्ट्स क्लब
  • कोपरेंज ग्राउंड
  • शिवाजी स्टेडियम
  • ओआल मैदान
  • ब्रेब्रान स्टेडियम
  • एमआईजी ग्राउंड
  • एमसीए ग्राउंड
  • रिलायंस जियो ग्राउंड
  • वानखेडे मैदान
  • संभाजी उद्यान (मुलुंड)
  • सुभाष नगर ग्राउंड (चेंबूर)
  • तिलक नगर ग्राउंड (चेंबूर)
  • घाटकोपर पोलिस ग्राउंड
  • शिवाजी मैदान (चूनाभट्टी)

'कोविन-ॲप' नोंदणी व 'अपॉइंटमेंट स्लॉट' नुसार लसीकरण

१ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर अनेक केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी ज्या नागरिकांची 'कोविन ॲप' वर नोंदणी झाली, ज्यांना संबंधित लसीकरण केंद्रावर जो मिळालेल्या 'अपॉइंटमेंट स्लॉट' अनुसारच लसीकरण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. दरम्यान, १४७ लसीकरण केंद्रे ही लशींच्या साठा उपलब्धतेनुसार कार्यरत आहेत.

'कोवीन ॲप' किंवा 'कोविन पोर्टल' यावर यशस्वीरित्या नोंदणी झाल्यावर 'अपॉइंटमेंट स्लॉट' मिळालेल्या व्यक्तींचेच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सर्व लसीकरण केंद्रांवर संबंधित बाबींची पडताळणी केल्यानंतरच नागरिकांना लसीकरण केंद्रात प्रवेश द्यावा, असे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

पहिल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक!

वय वर्षे ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्या व्यक्तींना कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्या पहिल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र हे 'हार्ड कॉपी' किंवा 'सॉफ्ट कॉपी' स्वरूपात सादर केल्यानंतर लसीकरण केंद्राच्या व्यवस्थापकांनी सदर बाबींची योग्य ती पडताळणी केल्यानंतर लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात येईल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा