Advertisement

आता Whatsapp वर मिळवा लसीकरण केंद्रांची माहिती, जाणून घ्या प्रक्रिया

आता WhatsApp वर चॅटिंग करून तुम्हाला जवळच्या लसीकरण केंद्राबाबतची सविस्तर माहिती मिळू शकते.

आता Whatsapp वर मिळवा लसीकरण केंद्रांची माहिती, जाणून घ्या प्रक्रिया
SHARES

एकीकडे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच दुसरीकडे लसीकरण मोहिमेंदेखील वेग घेतला आहे. आता तर तुम्ही घरबसल्या जवळच्या कोरोना लसीकरण केंद्राबाबतची माहिती मिळवू शकता. WhatsApp वर चॅटिंग करून तुम्हाला जवळच्या लसीकरण केंद्राबाबतची सविस्तर माहिती मिळू शकते.

या फिचरबाबतची माहिती ट्विटरद्वारे MyGov इंडियाच्या कोरोना हेल्पडेस्कनं दिली आहे. त्यानुसार तुम्ही आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही तुमच्या जवळील लसीकरण केंद्राबाबतची माहिती मिळवू शकतात. गेल्या वर्षी MyGov Corona Helpdesk चॅटबॉट लाँच झाला. याला हिंदी आणि इंग्रजी भाषेचा सपोर्ट आहे.

आता आपण टप्प्यानं टप्प्यानं जाणून घेऊया व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लसीकरण केंद्राबाबतची माहिती कशी मिळवावी.

१) कोरोना लसीकरण केंद्राबाबतची माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये +91-9013151515 हा क्रमांक सेव्ह करावा लागेल.

२) नंतर व्हॉट्सअ‍ॅप सुरू करून सेव्ह केलेल्या त्या क्रमांकावर Namaste असा मेसेज पाठवा.

३) नंतर ९ पर्यायांचा एक रिप्लाय येईल.

४) त्यापैकी तुम्हाला १ लसीकरणाबाबतच्या माहितीसाठी लिहून पाठवावा लागेल.

५) त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय मिळतील. यापैकी केंद्राबाबतच्या माहितीसाठी पुन्हा १ लिहून पाठवावा लागेल.

६) यानंतर तुम्हाला तुमचा पिन कोड विचारला जाईल, पिन कोड पाठवताच तुमच्या जवळ असलेल्या सर्व लसीकरण केंद्राबाबतची माहिती मिळेल.हेही वाचा

दिव्यांगांना कोरोना तपासणी, लसीकरणात प्राधान्य

मुंबईतील दुसरी कोरोना लाट ‘या’ महिन्यात ओसरणार, शास्त्रज्ञांची दिलासादायक माहिती

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा