Advertisement

टाटा समुहाकडून कोरोनाची चाचणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, 'असं' करतं काम

क्रिस्पर कॅस तंत्रज्ञान असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे. यामुळे आता रुग्णांचा स्वॅब जास्त अचूक आणि गतीनं मिळणार आहे.

टाटा समुहाकडून कोरोनाची चाचणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, 'असं' करतं काम
SHARES

टाटा समूहानं कोरोना तपासणीसाठी नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. क्रिस्पर कॅस तंत्रज्ञान असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे. यामुळे आता रुग्णांचा स्वॅब जास्त अचूक आणि गतीनं मिळणार आहे.

मुंबई आणि पुण्यात अशा दोन ठिकाणी या तंत्रज्ञानाद्वारे चाचणी केली जात आहे. येत्या शुक्रवारपासून याच तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं पुण्यात ही लॅब सुरु केली जाणार आहे. हे तंत्रज्ञान टाटा उद्योग समूहानं विकसित केलं आहे. त्यामुळे क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानातील सामंजस्य करारातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करणारी भारतातील पहिली लॅब ठरली आहे.


काय आहे क्रिस्पर कॅस तंत्रज्ञान?

क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांचे निदान अचूक आणि कमी वेळात होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे कोविड -१९ मधील कोरोनाबाबत निदान करण्याची अचूकता आता कित्येक पटीने वाढणार आहे. तसंच अँटिजेन टेस्टिंग आणि आरटी-पीसीआर तपासणीपेक्षा या तंत्रज्ञानानं होणारी तपासणी कित्येक पटीनं अचूक राहणार आहे.


कसं काम करतं?

या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वॅब घेतल्यापासून दोन ते तीन तासात रिपोर्ट येतो. याद्वारे रोज कमीत कमी ५०० ते २००० तपासण्या २४ तासात एका लॅबमध्ये केल्या जाऊ शकतात. तसेच स्वॅब घेणाऱ्यांकडे मोबाईलवर एक ॲप तयार करून दिलं आहे. त्यात त्याची माहिती भरल्यानंतर ज्यावेळी रिपोर्ट तयार होतो. तेव्हा तो रुग्णाच्या मेलवर किंवा मोबाईलवर आणि आयसीएमआरच्या पोर्टलवर एकाच वेळी जातो. त्यामुळे यात वेळेची बचत होते.

क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने युके, साऊथ आफ्रिकन, ब्राझिलियन व्हेरियंट देखील सहजपणे तपासता येणार आहेत. तसंच आरटीपीसीआर तपासणी करताना रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे शोधण्यासाठी जो स्कोअर देण्यात येतो तसाच तो यातही देण्यात आला आहे.

जर तो स्कोअर १० पेक्षा खाली आला तर तो रुग्ण निगेटिव्ह असेल. जर १० ते २० च्या मध्ये आला तर तो काठावर पॉझिटिव्ह असेल आणि २० च्या वर आला तर तो पूर्णपणे पॉझिटिव्ह असेल, असा अर्थ या चाचणीतून निघेल.हेही वाचा

होम आयसोलेशनमधील कोरोना रुग्णांना रुग्णालयात हलविण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारा- मुख्यमंत्री

ऑक्सिजनचा तुटवडा, IIT बॉम्बेनं शोधला 'हा' उपाय

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा