Advertisement

ऑक्सिजनचा तुटवडा, IIT बॉम्बेनं शोधला 'हा' उपाय

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बे पुन्हा एकदा देशाच्या मदतीला धावून आली आहे.

ऑक्सिजनचा तुटवडा, IIT बॉम्बेनं शोधला 'हा' उपाय
SHARES

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बे पुन्हा एकदा देशाच्या मदतीला धावून आली आहे. देशात Covid-19 रूग्णांच्या उपचारासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) चा तुटवडा जाणवत आहे. आयआयटीनं या समस्येवर एका उपाय आणला आहे.

एका प्रायोगिक प्रकल्पामध्ये आयआयटी मुंबईला यश मिळाले असून या प्रकल्पामुळे कोरोनावर उपचार करताना रूग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो असा आयआयटीचा दावा आहे. नायट्रोजन युनिटचं रूपांतर (Pressure Swing Adsorption (PSA) ऑक्सिजन युनिटमध्ये करण्याचा निर्णय आयआयटीनं घेतला आहे.

या प्रयोगाच्या चाचणीनंतर यशही आल्याचं आयआयटीनं स्पष्ट केलं आहे. महत्वाचं म्हणजे हे सोल्यूशन देशातही देण्याची तयारी आयआयटी मुंबईनं दर्शवली आहे. अवघ्या तीन दिवसात हा प्लॅंट उभारून त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत.

आयआयटीमध्ये या प्रायोगिक प्रकल्पासाठी झालेल्या चाचण्यांमध्ये अतिशय आशादायी अशी प्रगती दिसून आली आहे. या प्रयोगाअंतर्गत ऑक्सिजनची निर्मिती ३.५ एटीएम प्रेशनरनं करता येऊ शकते असं सिद्ध झालं आहे. त्यामध्ये ऑक्सिजनची शुद्धता ९३ टक्के ते ९६ टक्के या दरम्यान असेल.

हॉस्पिटलच्या ठिकाणी तसंच ज्याठिकाणी सातत्यानं ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करायची आहे, अशा ठिकाणी हा प्लॅंट उपयुक्त ठरू शकतो.

नायट्रोजन प्लॅन्टच्या सेटअपमध्ये मॉलेक्युर म्हणजे रेणूंचे कार्बन ते झिओलाईट असं रूपांतर करून ऑक्सिजन निर्मिती शक्य असल्याचं संधोधन आणि विकास विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक मिलिंद अत्रे यांनी सांगितलं. मिलिंद अत्रे हे संपुर्ण प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत.

नायट्रोजन प्लॅंट हे हवेतील ऑक्सिजन घेतात. अशा प्रकारचे प्लॅंट्स हे भारतात अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळेच या प्रत्येक प्लॅंटचे रूपांतर ऑक्सिजन जनरेटर म्हणून केले जाऊ शकते.

संपुर्ण प्रायोगिक प्रकल्प हा आयआयटी बॉम्बे, टाटा कन्सल्टींग इंजिनिअर्स, स्पॅनटेक इंजिनिअर्स यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या टीमनेच पीएसए नायट्रोजन आणि ऑक्सिजन प्लॅंट प्रॉडक्शनचा प्रायोगिक प्रकल्प उभारला आहे.हेही वाचा

एकरकमी १२ कोटी लस विकत घेण्याची महाराष्ट्राची तयारी- उद्धव ठाकरे

मुंबईत १ मे पासून लाॅकडाऊनची नवी गाइडलाइन? बीएमसीने केला खुलासा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा