Advertisement

मुंबईतील दुसरी कोरोना लाट ‘या’ महिन्यात ओसरणार, शास्त्रज्ञांची दिलासादायक माहिती

मुंबईकरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे मुंबईतील कोरोना संसर्गाची दुसरी लाट पुढच्या काही दिवसांत ओसणार आहे.

मुंबईतील दुसरी कोरोना लाट ‘या’ महिन्यात ओसरणार, शास्त्रज्ञांची दिलासादायक माहिती
SHARES

मागील काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना विषाणूचा (coronavirus) संसर्ग काही प्रमाणात कमी झाला असून कोरोना रुग्णवाढीचा वेग आणि पॉझिटिव्हिटी रेट देखील घटला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे मुंबईतील कोरोना संसर्गाची दुसरी लाट पुढच्या काही दिवसांत ओसणार आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी मुंबईतील कोरोना संसर्गावर अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. सध्या शहरात सुरू असलेलं लसीकरण, कोरोनाबाधितांची संख्या यावर गणिती आकड्यांच्या आधारे टाटा रिसर्चने हे निष्कर्ष काढले आहेत. 

पहिलं लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर जेव्हा सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले. तसतसे लोकं घराबाहेर पडू लागले, सार्वजनिक ठिकाणांवर पुन्हा गर्दी होऊ लागली, दुकानं, बाजारपेठा, कार्यालयांमध्ये माणसांची वर्दळ वाढली. सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्यावर कोरोना विषाणूचा पुन्हा वेगाने प्रसार होऊ लागला. तोच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरला. मुंबईत प्रामुख्याने लोकल ट्रेन, बसमधील गर्दी कोरोनावाढीस काढणीभूत ठरली. मुंबईसह (mumbai), पुणे, नाशिक, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग याच प्रकारे फैलावला, असं शास्त्रज्ञांनी नमूद केलं आहे. 

हेही वाचा- पुरेशा लस साठ्याअभावी ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण बंद

मुंबईबाबत बोलायचं झाल्यास, मुंबईत गेल्या २४ तासांत ३,६७२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या कमी झालेली असली, तरी मृतांची संख्या वाढू लागल्याचं दिसत आहे. मुंबईमधील कोरोना रुग्णांच्या दुपटीच्या कालावधी सरासरी १०० दिवसांवर पोहोचला आहे, तर कोरोना वाढीचा दर ०.६६ टक्क्यांवर घसरला आहे. 

कोरोना विषाणूचा सध्याचा स्ट्रेन हा गेल्या वर्षी आढळून आलेल्या स्ट्रेनपेक्षा २ ते २.५ पट अधिक संक्रामक आहे. मार्चमध्ये मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढला. त्यामुळेच मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली असावी, असं शास्त्रज्ञ म्हणाले.

मुंबई सध्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण सुरू आहे. मुंबईमध्ये महिन्याभरात २० लाख नागरिकांचं लसीकरण झालं, कुठलाही नवा स्ट्रेन आला नाही आणि लसीकरण सुरळीत सुरू राहिलं तर जून महिन्यापर्यंत मृत्यूदर कमी होण्याची शक्यता आहे. १ जुलैपासून शहरातील शाळा सुरू करता येतील. अर्थात हे केवळ भाकीत असून त्यात चुकाही होऊ शकतात असं, टीआयएफआरनं म्हटलं आहे.

(tata institute of fundamental research done a survey on second wave of covid 19 in mumbai)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा