Advertisement

पुरेशा लस साठ्याअभावी ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण बंद


पुरेशा लस साठ्याअभावी ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण बंद
SHARES

कोविड-१९ लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळं मुंबई महापालिका क्षेत्रातील शासकीय, महापालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवर पुन्हा एकदा लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. सोमवार ३ मे रोजी ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे लसीकरण होणार नाही. तर १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सध्याच्या पद्धतीप्रमाणे निर्देशित ५ केंद्रांवर सुरू राहील. शिवाय, ज्यांची कोविन अँपमध्ये नोंदणी झालेली आहे आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ दिलेला आहे, त्यांनाच लसीकरण केंद्रावर लस मिळणार आहे.

सध्या सर्व वयोगटातील नागरिक लसीकरण केंद्रावर मोठ्या स्वरूपात गर्दी करत आहेत, कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर आणि लसीकरण केंद्रावर येऊ नेय. महापालिका प्रशासनाकडून लस उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून लसीचा साठा प्राप्त होताच नागरिकांना कळविण्यात येणार आहे. यास्तव नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी करू नये असे विनम्र आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

कोविड-१९ लसीकरण मोहिमेसाठी मुंबईत, मुंबई महापालिका, शासन यांच्यातर्फे ६३ केंद्रे तसंच खासगी रुग्णालयात ७३ अशी एकूण १३६ कोविड-१९ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत कोविड प्रतिबंध लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्या कारणामुळं महानगरपालिका, शासकीय आणि खासगी कोविड लसीकरण केंद्रात सोमवार ३ मे २०२१ रोजी ४५ वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांचं लसीकरण होणार नाही.

दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ५ लसीकरण केंद्रावर प्रत्येकी ५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे,ते उद्या सोमवार, दिनांक ३ मे २०२१ रोजी देखील सकाळी ९ ते ५ या नियमित वेळेत सुरू राहील. हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप' मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे.

५ लसीकरण केंद्र

१. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).

२. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर) 

३. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).

४. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).

५. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.

लशींच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि नागरिकांना अवगत करण्यात येईल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा