Advertisement

मुंबईत २ ऑक्सिजन सिलेंडर रिफिलिंग प्लँटची निर्मिती होणार

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वेगानं वाढत असल्यानं अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे.

मुंबईत २ ऑक्सिजन सिलेंडर रिफिलिंग प्लँटची निर्मिती होणार
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वेगानं वाढत असल्यानं अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन रिफिलिंग प्लँटद्वारे पुरवण्यात येणारे ५० टक्के ऑक्सिजन ठाणे आणि नवी मुंबईला वळविले जात आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेनं मुंबईत स्वत:चे २ ऑक्सिजन सिलेंडर रिफिलिंग प्लँट्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पालिका लहान रुग्णालयांना पुरवत असलेले ऑक्सिजन सिलिंडर्स रिफिलिंगसाठी नवी मुंबईतील दोन रिफिलिंग प्लँट्सकडे जातात. परंतु मुंबईत जर एकदा रिफलिंग प्लँट्स तयार झाले तर शहरातील अनेक रुग्णालयांमधील ऑक्सिजन सिलेंडर्स नवी मुंबईत रिफिलिंगसाठी नेण्याची गरज भासणार नाही.

मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स, मुलुंडच्या रिचर्डसन व क्रुडास जम्बो सेंटरमध्ये आम्ही ऑक्सिजन रिफिलिंग प्लँट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यातील एक प्लँट लवकरचं सुरु होईल. त्यामुळे जम्बो आणि धुरा ऑक्सिजन सिलेंडर्स नवी मुंबईत रिफिलिंग प्लँटवर नेण्याची गरज भासणार नाही. राज्यातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेता राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा कोटा निश्चित केला आहे. या कोट्यानुसार लिक्विड ऑक्सिजन टँकरमध्ये किंवा जम्बो आणि दुरा सिलिंडेर्समध्ये ऑक्सिजन भरत ते रुग्णालयांना पाठवले जाते.

मुंबईला दरदिवसा २४० मेट्रिक टन इतके ऑक्सिजनची गरज असते, यातील १८० मेट्रिक टन ऑक्सिजन बड्या रुग्णालयांना पुरवले जाते. दरम्यान दुरा आणि सिलेंडर्सद्वारे ६० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा नवी मुंबईतील सतरामदास गॅसेस आणि फिनिक्स गॅसेस कंपन्या करतात.परंतु या ६० मेट्रिक टन पैकी ५० टक्के ऑक्सिजन पुरवठा पुरवठादार नवी मुंबई आणि ठाणे शहरात करत असल्याचे उघडकीस आले.

पालिकेने यासंदर्भात नवनियुक्त अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंग आणि कोकणचे विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना पत्रव्यवहार करत मुंबईला ऑक्सिजन सिलेंडर्सचा पूर्ण कोटा मिळावा यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करा अशी मागणी केली आहे. यासंदर्भात आम्ही पुरवठादाराला कारणे दाखवा नोटीस बजावली असून मुंबईला ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत न झाल्यास कारवाई होऊ शकते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा