कोविड चाचणी होणार आता ४९९ रुपयांत

मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅनचे लोकार्पण झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्पाईस हेल्थच्या व्हॅनचे लोकार्पण झाले. सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधा उपलबध करून दिल्याबद्दल स्पाईस हेल्थला धन्यवाद दिले.

३ व्हॅनच्या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त  ३ हजार कोरोना चाचण्या करता येतील. त्याचा अहवाल २४ तासात मिळेल आणि फक्त ४९९ रुपयांमध्ये कोरोना चाचणी करणं शक्य होईल, अशी माहिती आयुक्त श्री. चहल यांनी यावेळी दिली. गोरेगाव, बीकेसी आणि एनआयसी डोम वरळी इथल्या कोविड केंद्रात या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळा व्हॅनची उपलब्धता करून देण्यात आली आहे.

गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला तेंव्हा पुणे आणि मुंबईत कस्तुरबा इथं २ ठिकाणीच कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत होत्या. शासनानं काही दिवसांमध्ये ही संख्या ५०० वर नेली. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानातून कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यात आला. संशियातांची तपासणी करतांना सहव्याधीग्रस्तांचा शोध ही घेण्यात आला.

कोरोनावर आता लस उपलब्ध झाली असली तरी विविध देशात कोरोनाचे नवे स्ट्रेन येताना दिसत आहेत. त्यावर संशोधनही सुरू आहे. त्यामुळे आज ही कोविड रुग्णांचा शोध घेऊन त्यावर उपचार करण्याला शासनाचे प्राधान्य आहे. 

अशा गरजेच्यावेळी स्पाईस हेल्थ ने पुढे येऊन परवडणाऱ्या दरात कोराना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली, कमी वेळेत त्या चाचणीचा अहवाल ही मिळणार आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा नक्की लाभ होईल.

कार्यक्रमास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, स्पाईस जेटचे अध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संजय जयस्वाल, स्पाईस हेल्थचे जुबेर खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


हेही वाचा

नवी मुंबईत कोरोना लसीकरण केंद्रांत वाढ

परिचारिकांना मिळणार समान वेतन!

पुढील बातमी
इतर बातम्या