Advertisement

नवी मुंबईत कोरोना लसीकरण केंद्रांत वाढ

नवी मुंबईत आतापर्यंत १४ हजारांहून अधिक आरोग्यसेवकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. इथून पुढे लसीकरणाची संख्या वाढवली जाणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे.

नवी मुंबईत कोरोना लसीकरण केंद्रांत वाढ
SHARES

नवी मुंबईत कोरोना लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. आता २५ केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. आणखी २५ केंद्र वाढवून ५० लसीकरण केंद्र करण्याची तयारी पालिकेने केली आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत १४ हजारांहून अधिक आरोग्यसेवकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. इथून पुढे लसीकरणाची संख्या वाढवली जाणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. नवी मुंबईत १६ जानेवारीपासून चार केंद्रांवर रोज ४०० जणांना लस दिली जात आहे. त्यानंतर एका केंद्रांची वाढ करीत दररोज एक हजार जणांना लस देण्याचे नियोजन पालिकेने केले होते. त्यानंतर सहा केंद्रांची वाढ करीत आता १४ केंद्रांवर रोज १४०० आरोग्यसेवकांना लस दिली जात आहे. 

पालिकेने मागील दोन दिवसांपासून लसीकरण केंद्रात वाढ केली आहे.  दुसऱ्या टप्प्यातील पोलीस, पालिका कर्मचारी, सफाई कामगार, शिक्षक यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. 

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ८४ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णाचा मृत्यू झाला. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५३ हजार ६५२ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१,७३०  आहे. तर मृतांचा आकडा १०९७ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ८२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 



हेही वाचा -

नोकरी पाहिजे? मग 'या' WhatsApp नंबरवर 'Hi' पाठवा

शाळा, महाविद्यालयांच्या मैदानाचा वाहन प्रशिक्षणासाठी होणार वापर?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा