Advertisement

परिचारिकांना मिळणार समान वेतन!

शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

परिचारिकांना मिळणार समान वेतन!
SHARES

शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेची बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने, नियामक परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले की, कोविडसारख्या महामारीच्या काळात देशासह राज्याला डॉक्टरांबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांचं महत्त्व दिसून आलं आहे. येणाऱ्या काळात किती रुग्णांमागे एक डॉक्टर असावा हे जसं निश्चित करण्यात आलं आहे तसंच किती रुग्णांसाठी परिचारिका असाव्यात हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलं आहे. डॉक्टरांबरोबरच परिचारिकासुद्धा रुग्ण बरा होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने परिचारिकांचं किमान समान वेतन ठरविण्यात यावं आणि शासकीय आणि खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्यांना ते समान मिळावे याबाबत आवश्यक ती कार्यवाही वैद्यकीय शिक्षण विभागाने तातडीने सुरु करावी.

हेही वाचा- काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद निश्चित? मंत्रिमंडळातही फेरबदलाची शक्यता

वैद्यकीय क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे की या क्षेत्राची गरज प्रत्येक ठिकाणी लागते. कोविडनंतर आपल्या सर्वांना वैद्यकीय क्षेत्राचं महत्त्व समजून आलं आहे. शाळांमध्ये सुद्धा परिचारिका असणं आवश्यक आहे. कारखाने, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक यासारख्या ठिकाणी सुद्धा तात्काळ उपचारांसाठी परिचारिका असणं आवश्यक आहे. आगामी काळात परिचारिकांसाठी नवनवीन नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतील, कोणता अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्याची आवश्यकता आहे हा विचार करण्यासाठी मंडळाने थिंक टँक नेमावा. जेणेकरुन हा थिंक टँक या क्षेत्रातील वेगवेगळ्या संधीचा सांगोपांग विचार करु शकेल.

सध्या राज्यात मुंबई आणि पुणे वगळता महाराष्ट्रातील अनेक दुर्गम आणि डोंगराळ भागात रुग्णालयांमध्ये परिचारिकांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे येणाऱ्या काळात मंडळाने परिचारिकांची आवश्यकता किती आहे याबाबतचा अहवाल तयार करावा तसंच परिचारिकांची रिक्त पदे भरण्याबाबतची प्रक्रिया सुरु करण्यालाही प्राधान्य देण्यात यावं, असंही अमित देशमुख यांनी सांगितलं. 

येणाऱ्या शैक्षणिक वर्षात नर्सिंग अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टीकल परीक्षा हॉस्पीटलमध्ये घेण्याबरोबरच ऑनलाईन थेअरी परीक्षा घेता येऊ शकेल याबाबतची शक्यता तपासणं, अभ्यासक्रमासाठी नेमकी किती फी असावी याबाबत धोरण ठरविणं, मंडळावर आकृतीबंधामध्ये मंजूर असलेल्या पदांची नियुक्ती करणं, मंडळाच्या कार्यालयासाठी जागा घेणं आदी विषयांवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असंही अमित देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

(nurses will get minimum common wages in maharashtra says amit deshmukh)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा