Advertisement

राज्यात ५ लाखांहून अधिक व्यक्तींचं कोरोना लसीकरण

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ५ लाखांहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात ५ लाखांहून अधिक व्यक्तींचं कोरोना लसीकरण
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) आतापर्यंत एकूण ५ लाखांहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे यांनी ही माहिती दिली. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण केलं जाणार असून त्याची नोंदणी साधारणपणे १ मार्चपासून होऊ शकते, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

यासंदर्भात अधिक माहिती देताना राजेश टोपे (rajesh tope) म्हणाले, राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यभरातील ६५२ केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण केलं जात आहे. राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे लसीकरण सुरु आहे. प्रत्येक आठवड्याला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज साधारणपणे ४० ते ४५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केलं जात आहे.

हेही वाचा- मुंबईत कोरोना रूग्ण दुपटीचा कालावधी ५७४ दिवसांवर

आतापर्यंत कोविन पोर्टलवर १० लाख ५४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी ४ लाख ६८ हजार २९३ आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं आहे. ५ लाख ४७ हजार फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी झाली असून त्यापैकी ४१ हजार ४५३ जणांना लस  देण्यात आली आहे.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील व ज्यांना सहव्याधी आहे, अशा ५० वर्षांखालील व्यक्तींना कोरोना लसीकरण (coronavirus vaccination) करणार असून त्यासंदर्भात केंद्र शासनकडून सूचना मिळाल्या नाहीत. साधारणपणे १ मार्चच्या सुमारास त्यांची नोंदणी सुरु होण्याची शक्यता असून त्यानंतर लसीकरण केलं जाईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्यात लसीकरणादरम्यान कुठेही गंभीर दुष्परिणामाच्या घटनांची नोंद झाली नाही. लसीकरण सुरु असलं, तरी नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करणं आवश्यक असून मास्कचा वापर, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

(more than 5 lakh covid 19 vaccination complete in maharashtra says rajesh tope)

हेही वाचा- मुंबईत ६५ ठिकाणी स्ट्रीट फूड हब उभारणार


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा