Advertisement

मुंबईत कोरोना रूग्ण दुपटीचा कालावधी ५७४ दिवसांवर

सोमवारी मुंबईत ३९९ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ५०२ जण बरे झाले. सोमवारी मुंबईत ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ११ हजार ३९३ वर पोहोचली आहे.

मुंबईत कोरोना रूग्ण दुपटीचा कालावधी ५७४ दिवसांवर
SHARES

मुंबईत रोज नवीन कोरोना रुग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल ५७४ दिवसांवर पोहोचला आहे. तसंच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ टक्के आहे.

सोमवारी मुंबईत ३९९ नवीन कोरोना रुग्ण आढळले.  तर ५०२ जण बरे झाले. सोमवारी मुंबईत ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ११ हजार ३९३ वर पोहोचली आहे. मुंबईत आतापर्यंत २ लाख ९४ हजार ६३० कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ५३३५ आहे. 

राज्यात सोमवारी २२१६ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.५१ टक्के इतका आहे. कोरोनाने आतापर्यंत ५१ हजार ३२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत १९ लाख ५८ हजार ९७१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ३४ हजार ७२० इतकी आहे.


हेही वाचा -

मुंबईत सीएनजी, पीएनजी गॅस महागला

लोकलचं सध्याचं वेळापत्रक १५ दिवसांनंतर बदलणार?


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा