6 महिन्यांच्या बाळाने कोरोनाला हरवलं - उद्धव ठाकरे

कोरोनाची लागण झाली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही. 6 महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवलं आहे. 6 महिन्याचं बाळ करोनाला हरवू शकतं हेदेखील लक्षात घ्या. त्या मुलाच्या आईशी मी बोललो आहे. ३ वर्षांच्या आजींनीही कोरोनावर मात केली आहे. त्यांच्याशी मी बोललो आहे, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलासा दिला.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की, आपली कोरोनासोबतची लढाई सुरुच आहे. या लढाईत सगळेच उतरले आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. लॉकडाऊन वाढवला त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. परिस्थिती कितीही आपल्या हातात आली असली नसली तरीही आपण हा लढा गांभीर्याने घ्यायला हवा आणि आपण तो घेतला आहे. महाराष्ट्रात चाचण्या सर्वात जास्त होत आहे. त्यामुळे आपले आकडेही वाढत आहे.  महाराष्ट्रात काहीही विचित्र सुरु नाही हे लक्षात घ्या. आम्ही अतिशय खंबीरपणे याचा सामना करतोय आणि पुढेही करत राहू, असा विश्वास उद्धव यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनानंतर आर्थिक आघाड्यांवर कसं पुढे जायचं यावर अर्थतज्ज्ञांची एक समिती तयार केली असून ती सरकारला सल्ला देणार आहे. महाराष्ट्रात 10 जिल्ह्यांमध्ये कोरोनाला प्रवेश करू दिला नाही. शेतकऱ्यांना कुणीही थांबवणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 20 तारखेनंतर काय काय सुरू करता येईल याचा सरकार अंदाज घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

उद्धव म्हणाले की, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला आहे. ते ट्रिटमेंटची गाईडलाईन ठरवणार आहेत. यामध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर आहेत. काही खासगी क्षेत्रातले डॉक्टर आहेत. एक चांगलं काम या टीमने सुरु केलं आहे. मुंबईत २० ते २२ हजार चाचण्या झाल्या. कोव्हिड आणि नॉन कोव्हिड अशी आपण रुग्णालयांची विभागणी करत आहे.


हेही वाचा -

 कोरोना लढ्यासाठी मुंबईतील ९ नामवंत डाॅक्टरांची टास्क फोर्स

मुख्यमंत्र्यांनी फक्त फेसबुकवर तोंड दाखवून उपयोग काय? निलेश राणे यांचा सवाल



पुढील बातमी
इतर बातम्या