Advertisement

कोरोना लढ्यासाठी मुंबईतील ९ नामवंत डाॅक्टरांची टास्क फोर्स

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मुख्य सचिवांच्या पातळीवर या डॉक्टर्सचा टास्क फोर्स (task force) तयार करण्यात आला आहे.

कोरोना लढ्यासाठी मुंबईतील ९ नामवंत डाॅक्टरांची टास्क फोर्स
SHARES

कोरोनाविरूद्धचा (Coronavirus) लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मुख्य सचिवांच्या पातळीवर या डॉक्टर्सचा टास्क फोर्स (task force) तयार करण्यात आला आहे. टास्क फोर्समधील डॉक्टर राज्यभरातील कोरोना उपचार करणाऱ्या डॉकटर्सना हॉट लाईनच्या (hotline) माध्यमातूनही उपलब्ध असतील. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी या डॉक्टर्सशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून त्यांच्या कामांबाबतच्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कार्यवाहीचे प्रशासनाला निर्देश दिले.

हेही वाचा - मुंबईत 'ड्राइव्ह इन टेस्ट'ला सुरूवात, गाडीतच बसूनच होणार कोरोनाची चाचणी

या टास्क फोर्समध्ये खालील डॉकटर्स असतील,

  • डॉ. संजय ओक, डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू
  • डॉ. झहीर उडवाडिया, हिंदुजा रुग्णालय
  • डॉ. नागांवकर, लिलावती रुग्णालय 
  • डॉ. केदार तोरस्कर, वोक्हार्ट रुग्णालय 
  • डॉ. राहुल पंडित, फोर्टीस रुग्णालय
  • डॉ. एन.डी. कर्णिक, लोकमान्य टिळक रुग्णालय शीव
  • डॉ. झहिर विरानी, पी . ए .के. रुग्णालय 
  • डॉ. प्रविण बांगर, केईएम रुग्णालय 
  • डॉ. ओम श्रीवास्तव, कस्तुरबा रुग्णालय  

असं करतील सहाय्य

टास्क फोर्समधील डाॅक्टर्स (doctors in mumbai) एकीकडे राज्य शासनाला वैद्यकीय उपचारांबाबत सुयोग्य मार्गदर्शन कारातील तसंच राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आळीपाळीने हॉट लाईनवर सहाय्य करतील.

डेडिकेटेड कोविड रुग्णालय (covid-19 hospitals) सुरू करणे, या रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था, प्रत्येक रुग्णाला तो कोविडग्रस्त समजून उपचार सुरू करणे, चांगल्या सुसज्ज रुग्णवाहिका, कोविड आयसीयूमधील उपचार पद्धती यावर व अनुषंगिक उपचारांवर ही टीम देखरेखाही ठेवेल तसंच सल्ला देईल.

हेही वाचा - मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयाची क्षमता वाढवणार

वाढता मृत्यूदर 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या २ हजारांच्या पलिकडे गेली असून १५० हून अधिक जणांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यातील मृत्यूदर ६ ते ७ टक्के असून किडनी, उच्च रक्तदाब, किंवा इतर दुर्धर आजार असणाऱ्या ८० टक्के रुग्णांचा यांत प्रामुख्याने समावेश आहे.

राज्यातला वाढता मृत्यूदर चिंतेचा विषय असून तो कमी करणे नव्हे, तर एकाही व्यक्तीचा मृत्यू होता कामा नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा