Advertisement

मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयाची क्षमता वाढवणार

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयातील विलगीकरण केंद्रातील खाटांची क्षमता वाढवून १५०० इतकी करण्यात येणार आहे.

मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयाची क्षमता वाढवणार
SHARES
कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता झपाट्यानं वाढत आहे. या रुग्णांची संख्या लक्षात घेता तसंच, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयातील विलगीकरण केंद्रातील खाटांची क्षमता वाढवून १५०० इतकी करण्यात येणार आहे. सध्या या रुग्णालयात १५० हून अधिक विलगीकरण खाटांची उपलब्धता आहे. 

कोरोनाच्या उपचारांसाठी तयार करण्यात आलेले सेव्हन हिल्स हे कोरोनसाठी राज्यातील सर्वांत मोठे रुग्णालय ठरणार आहे. मुंबईतील कस्तुरबा, नायर, तसेच केईएम रुग्णालयांमध्येही करोना कक्ष सुरू करण्यात आले आहेत. कस्तुरबा रुग्णालयही पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे इतर ठिकाणी रुग्णांना पाठवण्यात येते. 

सेव्हन हिल्समध्ये क्षमता वाढवली की त्याचा निश्चितपणे रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांसाठी लाभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात सेव्हन हिल्समध्ये विमानतळावरून आलेल्या प्रवाशांचे विलगीकरण करण्यात आले होते. त्यानंतर विमानांची उड्डाणे थांबवण्यात आल्यानंतर या प्रवाशांनाही काही दिवसांनी घरी सोडण्यात आले. त्यांपैकी लक्षणे आढळून असलेल्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. लक्षणे दिसत नसलेल्यांना घरी पाठवण्यात आले.


सेव्हन हिल्स रुग्णालयातील २ डॉक्टरांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी विलग करण्यात आले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा