Advertisement

मुख्यमंत्र्यांनी फक्त फेसबुकवर तोंड दाखवून उपयोग काय? निलेश राणे यांचा सवाल

केवळ सोशल मीडियावर येऊन तोंड दाखवण्याचा काय उपयोग? सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी काही मदतनिधीच्या पॅकेजची घोषणा कधी करणार? असा प्रश्न भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी फक्त फेसबुकवर तोंड दाखवून उपयोग काय? निलेश राणे यांचा सवाल
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांनी महाराष्ट्रात लाॅकडाऊन (lockdown in maharashtra) वाढवण्याची घोषणा केल्याच्या पाठोपाठ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊन ३ मे पर्यंत वाढवलं आहे. अशा स्थितीत केवळ सोशल मीडियावर येऊन तोंड दाखवण्याचा काय उपयोग? सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी काही मदतनिधीच्या पॅकेजची घोषणा कधी करणार? असा प्रश्न उपस्थित करत भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे (bjp leader nilesh rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांना पुन्हा एकदा कात्रित पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

काय म्हणाले राणे?

केंद्र आणि राज्य सरकार दोघांकडूनही लाॅकडाऊन वाढवण्याची घोषणा झालेली आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकार महाराष्ट्राच्या जनतेसाठी काही पॅकेज किंवा आर्थिक स्वरुपाची मदत (stimulus package) जाहीर करणार आहे की नाही??? लोकांना धीर देण्यासाठी फेसबुकच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी नेहमी तोंड दाखवून उपयोग होणार नाही.

हेही वाचा - अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी ७ सदस्यीय समितीची स्थापना

लाॅकडाऊन वाढलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी मंगळवार १४ एप्रिल रोजी सकाळी देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात लाॅकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. लाॅकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासांची दखल घेत, जे जिल्हे रेड (red zone) झोनमध्ये नसतील, तसंच कोरोना आटोक्यात आणतील, तिथं २० एप्रिलनंतर संचारबंदीची अट थोडीफार शिथील करण्याचे संकेतही पंतप्रधानांनी दिले. त्याआधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती.

तरच प्रश्न सुटेल 

लाॅकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सातत्याने जनतेशी संवाद साधत आहेत. या संवादातून ते लाॅकडाऊन आणि कोरोनासंदर्भातील उपाययोजनांची माहिती देतानाच जनतेला घरी राहण्याचं तसंच प्रकृतीकडे लक्ष देण्याचं आवाहन देखील करत आहेत. 

परंतु राज्यात हातावर पोट असलेले लाखो लोकं आहेत, उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने या सगळ्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावू लागला आहे. त्यामुळे जनतेला केवळ तोंडी धीर देऊन उपयोग नाही. तर सर्वसामान्यांना आर्थिक पॅकेज (stimulus package) देऊ केल्यास त्यांचा त्रास थोडाफार कमी होईल, असं म्हणणं राणे मांडत आहेत.

या आधी भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

हेही वाचा - कोरोना लढ्यासाठी मुंबईतील ९ नामवंत डाॅक्टरांची टास्क फोर्स


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा