१३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता

राज्यातील १३४ खासगी रुग्णालयांना केंद्रानं लसीकरणासाठी मान्यता दिल्याची माहिती राज्य सरकारनं गुरुवारी दिली. लसीकरणाचा वेग वाढवण्याचं आव्हान आपल्यासमोर असून, ३-४ महिन्यांत प्राधान्य गटातील सर्वांच्या लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी प्रशासानाला दिले.

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं कठोर निर्बंध लागू करण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवाद यंत्रणेच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांशी संवाद साधत लसीकरणाचा आढावा घेतला.

गुरुवारी राज्यात आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. २४ तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना कोरोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच दिलासादायक बाब म्हणजे, १२ हजार १७४ जणांनी या आजारावर मात केली आहे.


हेही वाचा -

राज्यात १२,५०० पोलिसांची भरती करणार, गृहमंत्र्यांची घोषणा

वाढत्या कोरोनामुळं दादरच्या बाजाराचे पुन्हा स्थलांतर?


पुढील बातमी
इतर बातम्या