राज्यात १२,५०० पोलिसांची भरती करणार, गृहमंत्र्यांची घोषणा

राज्यात कोरोनामुळे पोलीस भरतीला ब्रेक मिळाला होता. पण आता पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० पोलिसांची भरती करण्यात येणार आहे.

राज्यात १२,५०० पोलिसांची भरती करणार, गृहमंत्र्यांची घोषणा
SHARES

कोरोनामुळे रखडलेली पोलीस भरती आता लवकरच होणार आहे. यावेळी राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. 

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीतील स्फोटांचं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मुंबईचे पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. 

राज्यात कोरोनामुळे पोलीस भरतीला ब्रेक मिळाला होता. पण आता पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. राज्यात पहिल्यांदाच १२५०० पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. कोरोनाचा पोलिस भरतीवर परिणाम झाला आहे. पहिल्या टप्प्यात ५३०० पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली.  राज्याची आर्थिक परिस्थिती खराब असताना १२५०० पोलिसांना सेवेत घेण्याचा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आल्याचंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

यावेळी ते म्हणाले की,  अंबानी स्फोटक प्रकरणाच्या तपासात आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या. त्यामुळे आता निष्पक्ष चौकशीसाठी मुंबईच्या आयुक्तांसह राज्यातील इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तसेच, आता अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून योग्यपणे सुरु आहे. या चौकशीत जे सत्य समोर येईल त्यानंतर राज्य सरकार दोषींवर कारवाई करेल. खालच्या किंवा वरच्या दर्जाचा कोणताही अधिकारी असो त्याच्यावर कारवाई होईल.


हेही वाचा- 

रिक्षा-टॅक्सीच्या मीटर बदल प्रक्रियेसाठी मोबाइल अ‍ॅप

 देशातील सर्व टोलनाके हटवणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा