धारावीसाठी पालिकेचा 'असा' आहे अॅक्शन प्लान

मुंबईत धारावी कोरोनाच्या रुग्णांचा हाॅटस्पाॅट बनला आहे. धारावीत रोज सरासरी ३५ पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने धारावीसाठी अॅक्शन प्लान तयार केला आहे. या अॅक्शन प्लानमध्ये धारावीत आता संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात येत आहे. यासाठी पालिकेने विलगीकरण कक्षही तयार केले आहेत.

अॅक्शन प्लाननुसार, धारावीत नागरिकांच्या स्क्रीनिंगसाठी पालिकेचे ९ दवाखाने आणि ३५० खासगी दवाखाने सज्ज ठेवेल आहेत. या दवाखान्यांमध्ये तपासल्यानंतर आवश्यकता वाटल्यास  रहिवाशांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठवलं जात आहे. रुग्णाला विलगीकरण कक्षात नेण्यासाठी पालिकेकडूनच वाहतुकीची व्यवस्था केली जात आहे. कोरोनाची लक्षण आढळणाऱ्या रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल करून घेण्यासाठी एका वाहनातून लाऊडस्पीकरद्वारे आवाहन करण्यात येत आहे.

सर्व विलगीकरण केंद्रांमध्ये डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय चोवीस तास कार्यरत आहेत. त्याशिवाय केंद्र सहप्रमुखही आहेत. या केंद्रात कम्युनिटी किचन तयार करण्यात आले असून रुग्णांना नाश्ता, दुपार आणि रात्रीचं जेवण दिलं जात आहे. त्याशिवाय हे केंद्र दररोज सॅनिटाइज केलं जात आहे. यासाठी प्रत्येक केंद्रावर एक पथक ठेवण्यात आलं आहे.

प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी ३० एनजीओ कार्यरत आहेत. त या रुग्णांना आवश्यक ती औषधेही देण्यात येत आहेत. त्याशिवाय कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना साई हॉस्पिटल, लाइफ केअर, आयुष, फॅमिली केअर आणि नर्सिंग होममध्ये हलविण्यात येत आहे. जास्तीत जास्त रुग्णांवर या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. मात्र, प्रकृती चिंताजनक असलेल्या आणि ५५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या रुग्णांना पालिकेच्या मोठ्या रुग्णालयात पाठवलं जात आहे.

या ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण केंद्र

- धारावी महापालिका शाळा

-  राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

-  मनोहर जोशी विद्यालय

- माहीम नेचर पार्क

- रुपारेल कॉलेज हॉस्टेल

- स्काऊट अँड गाइड हॉल

- डॉ. अँटिनिओ डा' सिल्वा स्कूल


हेही वाचा -

Maharashtra Breaking | 531 रक्षकच कोरोनाच्या विळख्यात...

१० जूनपर्यंत १०वी व १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणार?


पुढील बातमी
इतर बातम्या