कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईकर मोठ्या समस्यांमा तोंड देत आहेत. अशातच मुंबईत सध्या पावसाळा सुरू असून, या पावसामुळं उद्भवणाऱ्या आजारांमुळं आणखी त्रासात भर पडण्याची भीती मुंबईकरांना सतावत होती. परंतु, २०१६ च्या तुलनेमध्ये यावर्षी पहिल्या ५ महिन्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ६८ टक्के, तर मलेरियाच्या रुग्णसंख्येमध्ये ५४ टक्क्यांची घट झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०१६ मध्ये मे महिन्यापर्यंत ११४ जणांना डेंग्यूची लागण झाली होती, तर २०२० मध्ये पहिल्या ५ महिन्यांत हा आकडा ३७ आहे. ४ वर्षांपूर्वी मलेरियाची रुग्णसंख्या १ हजार ६२८ होती. ही संख्या यावर्षी ७५३ आहे.
महापालिकेनं कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारांसाठी वेगळी वैद्यकीय व्यवस्था केली आहे. सायन रुग्णालयांच्या परिसरामध्ये करोनासाठी रुग्णालयाच्या व्यवस्थेसह वॉर्डनिहाय रुग्णालयांची उपलब्धताही करण्यात आली आहे. तसंच, यंदा लॉकडाऊनमुळं हे प्रमाण कमी झाल्याचं समजतं. डेंग्यू आणि मलेरियाचा त्रास पावसाळ्यामध्ये अधिक वाढू शकतो, यादृष्टीने तयारी करण्यात आल्याचं समजतं.
मलेरियाची रुग्णसंख्या
डेंग्यूची रुग्णसंख्या
हेही वाचा -
Ganesh Chaturthi 2020: परंपरा खंडीत करू नका, ‘लालबागचा राजा’ला ‘त्यांची’ आग्रहाची विनंती
Mumbai Rains: ४ जुलैपासून मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता