Advertisement

Mumbai Rains: ४ जुलैपासून मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईच्या विविध भागांत तुरळक पाऊस पडल्यानंतर ४ जुलैच्या सुमारास शहरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Mumbai Rains: ४ जुलैपासून मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
SHARES

मुंबईच्या विविध भागांत तुरळक पाऊस पडल्यानंतर ४ जुलैच्या सुमारास शहरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटच्या म्हणण्यानुसार दक्षिण गुजरात आणि आसपासच्या भागात चक्रीवादळ फिरत आहे. हे चक्रीवादळ जोर धरण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात ३ जुलै किंवा ४ जुलैपर्यंत मान्सून सक्रिय होईल. चक्रीवादळामुळे ६ किंवा ७ जुलैपर्यंत हीच परिस्थिती राहू शकेल. या दिवसांत मुंबई व उपनगरामध्ये मुसळधार पावसासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील २ दिवस तरी मुंबईत तुरळकच पाऊस पडत राहील. 

हेही वाचा - आला पावसाळा, आपल्या त्वचेला सांभाळा!

स्कायमेटच्या नोंदीनुसार गेल्या २४ तासांमध्ये कुलाबा वेधशाळा परिसरात ६ मिमी, सांताक्रूझमध्ये ९.४ मिमी आणि हाजी अलीमध्ये ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून सक्रिय होताच तापमानात काही प्रमाणात घसरण होईल. परिणामी मुंबईकरांना उष्ण व दमट हवामानातून दिलासा मिळेल.

मुंबईत जुलै महिन्यात सरासरी ८४०.७ मिमी म्हणजेच चांगलाच पाऊस पडतो. परंतु यावर्षी मान्सून सक्रिय होण्यास विलंब झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे ७ तलाव म्हणजे भातसा, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर आणि तुळशी आणि विहार अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईत आतापर्यंत तुरळक पाऊस पडला असला, तरी मागील ६ वर्षांमध्ये या तलावांत १० टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक राहिल्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे यंदा चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा मुंबईकर करत आहेत.

हेही वाचा - मुंबई मेट्रो-३साठी पावसाळी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा