Coronavirus update: राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५३७ वर

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची (Coronavirus) संख्या आता ५३७ वर गेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९० होती. त्यात दिवसभरात ४७ ने वाढली आहे. या ४७ रुग्णांपैकी ४३ रुग्ण मुंबई आणि ठाण्यातले आहेत. 

शहरात कोरोनाबाधित (covid-19) रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या ४७ रुग्णांपैकी २८ रुग्ण मुंबईतले तर १५ रुग्ण ठाण्यात आढळले आहेत. तर अमरावतीत १ रुग्ण, २ पुण्यात, तर पिंपरीत १ रुग्ण सापडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ५३७ वर गेली आहे. 

हेही वाचा - मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, राज ठाकरे संतापले

मुंबई महापालिका क्षेत्रासाठी २९२, पुणे महानगरपालिका ४१३, नागपूर महापालिका २१०पथके कार्यरत आहेत. पथकामार्फत घराघरांत सर्वेक्षणाचं काम केलं जात असून. राज्यभरात सुमारे १८ जिल्ह्यांमध्ये २४५५ पथके सर्वेक्षणाचं काम करीत आहेत. कालपर्यंत सुमारे ९ लाख २५ हजार ८२८ नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope)  यांनी दिली. 

राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत ‘क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’ अंमलात आणण्यात येत आहे.

राज्यात आतापर्यंत ५० करोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून २३०५ खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

हेही वाचा - ... तर देश जाऊ शकतो १ आठवडा अंधारात!

पुढील बातमी
इतर बातम्या